आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्ह्यातील ३५ हजार शेतकरी "गारपीट' मदतीच्या प्रतीक्षेत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या वादळी पाऊस गारपिटीमुळे जिल्ह्यातील १८ हजार ६५३.४९ हेक्टरवरील पिकांसह फळ भाज्यांचे नुकसान झाले. प्रशासनाकडून ५२१ गावांमधील ३३ टक्केच्या वर पिकांच्या नुकसानाचा अंतिम अहवाल शासनाला पाठवण्यात आला असला तरी या गारपिटीच्या तडाख्याने हवालदिल झालेले सुमारे ३५ हजार शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे.
धरण विहिरीच्या माध्यमातून सिंचनाची सुविधा असलेल्या विविध भागांत रब्बी हंगामात पिकांची लागवड केली जातात. यामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, संत्री, मोसंबी, केळी, कांदा भाजीपाला आदी पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात २८, २९ फेब्रुवारी १, मार्चला वादळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे सर्वाधिक हजार ६७८.१० हेक्टरवरील संत्रा मोसंबीचे नुकसान झाले. हजार ९६६.१२ हेक्टर गहू, तर हजार ४८१.५१ हेक्टरवरील हरभऱ्याचे नुकसान झाले. अवेळी आलेल्या वादळी पाऊस गारपिटीने पीक, तसेच फळपिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यपालन अधिकारी सुनील पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने नुकसानाचा अंतिम अहवाल एप्रिलला शासनास सादर करण्यात आला. मान्सूनच्या पावसाची अनियमितता असल्याने खरीप हंगामावर निर्भर राहता जिल्ह्यातील अनेक शेतकरी बारमाही पिकांकडे वळल्याचे दृष्टीस येत आहे. असे असले तरी सिंचन सुविधा असलेल्या शेतकऱ्यांची संख्या तुलनेत कमीच आहे. शेतकरी आत्महत्यांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यात पीक पद्धतीत बदल येणे ही चांगली बाब आहे. मात्र, निसर्गाची साथ मिळत नसल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला असला, तरी शासनाकडून मदत कधी मिळेल याची शेतकऱ्यांना आस लागली आहे.

दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान : वादळीपाऊस गारपिटीने चांदूर बाजार अचलपूर या दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले. चांदूर बाजार तालुक्यात ११९, तर अचलपूर तालुक्यातील १५२ गावांना वादळी पाऊस गारपिटीचा फटका बसला. चांदूर बाजारमध्ये हजार २५७.०४ हेक्टर गहू, हजार ०३१.५८ हेक्टरवर संत्र्याचे नुकसान झाले. अचलपूर तालुक्यात हजार १७२.०६ हेक्टर गहू, तर हजार ७३४.२९ हेक्टरवर संत्र्याचे नुकसान झाले

१९हजार हेक्टरवर ३३ टक्केच्या अात : जिल्ह्यातील१९ हजार १९१.०१ हेक्टरवरील पिके फळपिकांचे ३३ टक्केच्या आत नुकसान झाले. शासनाच्या नवीन निकषाप्रमाणे ३३ टक्केच्या वर अधिक नुकसान असेल, तर नैसर्गिक आपत्तीतून मदत दिली जाते. ३३ टक्केच्या आतमध्ये हजार ९५१.०९ हेक्टर गहू, हजार ७९४ हेक्टर हरभरा, हजार ३०३.६० हेक्टरवरील संत्रा-मोसंबीचे नुकसान झाले. त्यांना मदतीची प्रतिक्षा आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

बाधित शेतकऱ्यांची संख्या
तालुका गावे शेतकरी
वादळी पाऊस गारपिटीने जिल्ह्यातील १८ हजार ६५३ हेक्टरवरील नुकसानाचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. प्रशासनाकडून पाठवण्यात आलेल्या अहवालानुसार शासनाकडून मदत केली जाईल. शासनाकडून मदत मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
मदत मिळेल

पुढे काय? अहवाल पाठवला
^जिल्ह्यातफेब्रुवारीमार्च महिन्यात वादळी पाऊस-गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची फळे पिकांची पाहणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी तहसीलदारांकडून पंचमामे करण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या मदत पुनर्वसन विभागाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी कृषी अधिकाऱ्यांच्या संयुक्त स्वाक्षरीने अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. दत्तात्रय मुळे, जिल्हाकृषी अधीक्षक कृषी अधिकारी.