आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधम बाप 5 वर्षांपासून करत होता अत्याचार, घरसोडून जाताना पोलिसांना सापडली मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - पोटच्‍या अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार करण्याची बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उमरखेड शहरात उघडकीस आली आहे. पोलिसांच्‍या संवेदनशीलतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी नराधम पित्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.  
 
काय आहे प्रकरण
- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे बुधवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एक मुलगी महागांव रस्त्याने जाताना दिसली.
- पोलिसांनी तिची चौकशी केली असता ती घर सोडून जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन त्यामागील कारण विचारले.
- 11वीत शिकत असणाऱ्या मुलीने तिची आपबीती पोलिसांसमोर कथन केली. नराधम बाप जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार आपल्‍यावर अत्याचार करत असल्याने वैतागुन घर सोडून जात असल्याचे पीडित मुलीने सांगितले.
 
केव्हापासून सुरु होते अत्याचार
- पोलिसच आता बापाच्या अत्याचारातून सुटका करु शकत असल्याचा विश्वास मिळाल्यामुळे पीडितेने सर्व कहानी कथन केली.
- ती म्हणाली,  हा प्रकार ती सहाव्या वर्गात होती तेव्‍हापासून सुरू आहे. पीडित मुलगी सध्‍या ११वी मध्ये शिकत आहे.  
-  नराधम पित्याच्या अत्याचारबद्दल  तिने व तिच्या आईने आवाज उठवण्‍याचा प्रयत्न केला होता. मात्र दोघींना जिवे मारून आत्महत्या करण्याची धमकी तिच्या वडिलांनी दिली होती. त्‍यामुळे आईनेही हा प्रकार 5 वर्षे निमूटपणे सहन केला.
- बुधवारी रात्री सुद्धा नराधम पित्याने पोटच्या लेकीवर हात टाकण्याचा प्रयत्‍न केला. या सततच्या अत्याचाराला वैतागून मुलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला, आणि संधी मिळताच रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडली, असे मुलीने सांगितले.
 
नराधम पित्याला अटक
- मुलीच्या फिर्यादीवरून उमरखेड पोलिस स्टेशनमध्‍ये बाल लैंगिक संरक्षण अधिनियम २०१२ (४) अंतर्गत आणि 376 नुसार आरोपी रामबहार रामनाथ प्रजापती (४५) वर गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. पित्याला पोलिसांनी अटक केली असुन पुढील तपास ठाणेदार हनुमंत गायकवाड करत आहे.             
बातम्या आणखी आहेत...