आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्‍मदात्‍या पित्‍याकडून मुलीचे 4 महिने लैगिंक शोषण, वर्ध्‍यातील धक्‍कादायक घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- वर्ध्‍यातील पुलगाव येथे जन्‍मदाता पित्‍यानेच आपल्‍या 13 वर्षीय मुलीचे 4 महिने लैगिंक शोषण केल्‍याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली आहे. पुलगाव शहरातील दहेगावातील ही घटना आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पित्‍याविरोधात संताप व्‍यक्‍त करण्‍यात आहे. मुलीच्‍या तक्रारीवरुन नराधम पित्‍याविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

 

आरोपी दारु विक्रीचे काम करत असल्‍याची माहिती आहे. बुधवारी मुलीच्‍या तक्रारीवरुन त्‍याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्‍याला अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक स्‍वप्‍ना निरांजने करत आहे. या नराधम पित्‍याविरोधात पोलिसांनी 376 (2)(1), 376 (2) एन, 346 (2) एफ, 377, 506, बालकाचे अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 6 नूसार गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...