आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेलाभर पाणी सांडल्याने क्रूर पित्‍याने स्वतःच्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी मारले, अखेर मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - चिमुकल्‍यांच्‍या हातून पेलाभर पाणी सांडले म्‍हणून एका निर्दयी बापाने त्‍याला एवढी मारहाण केली त्‍यात मुलाचा मृत्‍यू झाला. ही धक्‍कादायक घटना नागपूरातील इंदिरानगर भागात घडली आहे. या तीन वर्षाच्‍या मुलाची हत्‍या करून घटनेला अपघाताचे रूप देण्‍याचा प्रयत्‍न आरोपी वडील धर्मेंद्र डोंगरे याने केला आहे. म्‍हणे पाण्‍याच्‍या टाकीत पडून झाला मृत्‍यू..
- मुलाचा मृत्‍यू पाण्‍याच्‍या टाकीत पडून झाला असा दावा आरोपी वडिलाने केला आहे;
- शवविच्‍छेदनानंतर आरोपीने केलेला दावा खोटा असल्‍याचे लक्षात आले.
- जबर मारहाण केल्‍याने मुलाचा मृत्‍यू झाल्‍याचे लक्षात आले आहे.
- पोलिसांनी आरोपी वडिल धर्मेंद्र डोंगरे याला अटक केली आहे.
असे आहे प्रकरण..
- श्रेयस डोंगरे असे मारहाणीत दगावलेल्‍या तीन वर्षीय चिमुकल्याचे नाव आहे.
- श्रेयसला लाथांनी तुडवत त्याच्‍या वडिलांनी त्‍याची हत्‍या केली आहे;
- 5 मे रोजी रात्री नऊच्या सुमारास इंदिरानगर भागात ही घटना घडली.
- श्रेयस आणि त्‍याचा 5 वर्षीय आतेभाऊ घरीच खेळत होते.
- खेळताना दोघांनी फ्रीजमधील बॉटल काढली; त्यांच्या हातून पेलाभर पाणी जमिनीवर सांडले.
- या रागातून धर्मेंद्रने आधी बहिणीच्या मुलाला मारहाण केली. त्यात त्याचा हात तुटला.
- दुसऱ्याच्या मुलाला का मारता असे धर्मेंद्रला त्‍याच्‍या पत्नीने विचारताच, त्‍याचा राग अनावर झाला व त्‍याने पोटच्‍या मुलाला जबर मारहाण करत त्‍याची हत्‍या केली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, श्रेयसला असे लाथांनी तुडवले... जराही दयामाया दाखवली नाही....
बातम्या आणखी आहेत...