आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमप्रकरणातून कला शिक्षिकेची आत्महत्या, विवाहित प्रियकराने दिला धोका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रियकराने धोका दिल्याने एका २४ वर्षीय कला शिक्षिकेने भाड्याच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शहरातील लघुवेतन काॅलनीमध्ये शनिवारी (दि. १६) घडली. शुभांगी अशोकराव गिरी (२४) असे मृतक युवतीचे नाव आहे. मूळची दर्यापूर येथील रहिवासी शुभांगी शहरातील एका महाविद्यालयात कला शिक्षिका म्हणून कार्यरत होती.ती लघुवेतन काॅलनीमध्ये व्दारकाबाई गिरी यांच्याकडे मागील सात वर्षांपासून भाड्याने राहत होती. याच ठिकाणी राहून तिने शिक्षण पूर्ण केले होते. मागील काही दिवसांपासून शुभांगी शहरातील एका कला महाविद्यालयात कला शिक्षिका म्हणून काम करत होती.
 
आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तिने म्हटले आहे की , तिचे एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. त्याच्यापासून तिला गर्भधारणाही झाली होती. त्याचे इतरत्र लग्न झाले असतानाही त्याने आपल्या सोबत दुसरे लग्न केले. मात्र बाहेर इतरत्र केलेले लग्न आपल्यापासून लपवून ठेवले होते. ज्यावेळी त्याचे दुसरे लग्न झाल्याची माहिती मिळाली त्यावेळी आपल्याला धक्का बसला. त्याने दुसरे लग्न केल्याची पुसटशी कल्पनासुध्दा मला होऊ दिली नाही. दरम्यान गर्भधारणा झाल्यामुळे त्याने अनेकदा मला मारण्याचा प्रयत्न केला, इतकेच नाही तर एकदा त्याने माझा हातसुध्दा कापला होता. त्याने दिलेला धोका मी सहन करू शकत नाही. घटनेच्या एक दिवसांपुर्वी तो घरी आला त्याने जबरदस्ती केली. इतकेच नाही तर गोळीद्वारे गर्भ पाडण्याचा प्रयत्न केला. तो अतिशय वाईट आहे. त्याला मी माफ करणार नाही, असे शुभांगीने चिठ्ठीत नमूद केले आहे. सदर चिठ्ठी फ्रेजरपुरा पोलिसांनी जप्त केली आहे. माहिती मिळताच ठाणेदार आठवले ताफ्यासह घटनास्थळ गाठलेे. पोलिसांनी त्या युवकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
 
‘त्या’ युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
युवतीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या असल्याचे पुढे येत आहे. चिठ्ठीत उल्लेख असलेल्या एका युवकाविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
- राहुल आठवले, ठाणेदार, फ्रेजरपुरा.
 
पोलिस काका, मला न्याय द्या!
शुभांगीनेचिठ्ठीच्या शेवटी आई बाबा तुम्ही खूप चांगले आहे. मला माफ करा. पोलिस काका कृपा करून मला न्याय द्या, मी खरी आहे. आपण न्याय दिल्यास खरी व्यक्ती जिंकणार, असेे नमूद करुन न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे.
बातम्या आणखी आहेत...