आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप आमदार पुत्रांची बारमध्ये ताेडफाेड; प्रतिहल्ल्यात एक ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - बिअर बारमध्ये पार्टी केल्यावर बिलात डिस्काउंट मागण्यावरून झालेल्या वादावादीत भाजपचे नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या दोन्ही मुलांनी बारमालकावर दारूच्या बाटल्यांनी हल्ला चढवून बारमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेनंतर बारमालकाने खोपडे पुत्र आणि त्यांच्या साथीदाराचा पाठलाग करून एका साथीदारास ठार केल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास नागपुरात घडली. या हल्ल्यात ठार झालेल्या मृताचे नाव शुभम सुधीर महाकाळकर (२३, रा. महाल, चिटणीस पार्कजवळ, नागपूर) असे होते. ताे अामदार खाेपडे यांच्या मुलाचा मित्र हाेता.

अंबाझरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित आणि अभिजित हे दोघे आपल्या दोन मित्रांसह रविवारी रात्री शंकरनगर चौकातील क्लाऊड सेव्हन बिअर बारमध्ये पार्टी करायला गेले होते. तेथे भरपूर दारू प्यायल्यावर त्यांनी जेवणही केले. वेटरने बिल दिल्यावर अभिजित खोपडे याने बिलात डिस्काउंट देण्याची मागणी केली. बारमालक सावन ऊर्फ सनी बमब्रोतवार (२१, रा. गांधी चौक, सदर) याने मात्र त्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या अभिजित व त्याच्या साथीदारांनी बारलकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. दाेन्ही गटात हुज्जत सुरू असताना खोपडे बंधूंचे आणखी काही मित्र तेथे पोहोचले. त्यावर अधिकच जाेर चढलेल्या खोपडे बंधूंनी दारूची बाटली बारमालक सावन बमब्रोतवार याच्या डोक्यावर फोडून त्याला जखमी केले. त्यांच्या इतर साथीदारांनीही बारमालक सावन याला बेदम मारहाण केली, तसेच हाॅटेलात ताेडफाेड करून माेठ्या प्रमाणावर नुकसान केले. या घटनेनंतर खाेपडे बंधूंसह त्यांचे साथीदार बारमधून निघून गेले.

अामदार पुत्रही जखमी
खाेपडे बंधूंनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बारमालक सनी याने आपल्या मित्रांना बोलावून घेतले व खोपडे बंधूंचा पाठलाग केला. बारपासून काही अंतरावर असलेल्या लक्ष्मी भुवन चौकात त्यांनी खोपडे बंधू आणि त्यांच्या साथीदारावर चाकू, हॉकी स्टिक्सने हल्ला चढविला. या हल्ल्यात खोपडे बंधूंचा साथीदार शुभम महाकाळकर हा जागीच ठार झाला. तर खोपडे बंधूही जबर जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बारमालक, अामदार पुत्रांवर गुन्हा दाखल
या घटनेनंतर अंबाझरी पोलिसांनी बारमालक सनी याच्यासह त्याच्या साथीदारांवर खुनाचा गुन्हा नोंदविला अाहे तर अामदार पुत्र खोपडेबंधू व त्यांच्या साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले आहेत, तर खाेपडे बंधूंनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी बारमालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत अद्याप कोणालाही अटक झालेली नसल्याचे अंबाझरी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात गुंडागर्दी माेठ्या प्रमाणावर वाढली अाहे. या प्रकरणात तर अामदार पुत्राचा सहभाग असल्यामुळे त्याची दिवसभर चर्चा रंगली हाेती.

पुढील स्लाइडवर वाचा, बारमध्ये धुडगूस घातल्याप्रकरणी आमदारपुत्रांवर गुन्हा... आणि शुुभम महाकाळकरचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...