आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कुस्तीऐवजी हाणामारीच रंगली!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कुस्तीऐवजी हाणामारीच रंगल्याचा प्रसंग शनिवारी घडला. खुल्या गटात गादी विभागातील उपांत्य सामन्यात पुणे शहरच्या महेश मोहोळने पुणे जिल्ह्याच्या बापू ठाणेकरचा पराभव केला.अपयशी पहिलवानाला बाहेर बसलेल्या प्रेक्षक पहिलवानांनी डिवचले. त्यामुळे बापू ठाणेकरचे समर्थक चिडले. परिणामी दोन गटांमध्ये आधी शाब्दिक चकमक झडली नंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांच्या समर्थकांनी खुर्च्या उचलून एकमेकांच्या अंगावर भिरकावल्या.

खुर्चीच्या जोरदार प्रहारामुळे ठाणेकरचे डोके फुटून तो रक्तबंबाळ झाला. स्टेडियममध्ये तैनात पोलिसांनी मध्यस्थी करून उभय गटांना शांत केले. पहिलवानाला डिवचणाऱ्या कामठीच्या तरुणालाही चांगलाच चोप बसला. त्याला पोलिसांनी अटक करून गणेशपेठ ठाण्यात नेले. दोन्ही पहिलवान त्यांचे समर्थक पसार झाले.

त्यावेळी तैनात होते दोन पोलिस
स्टेडियम वरज्या वेळी हाणामारी सुरू झाली त्या वेळी दोनच पोलिस कर्मचारी उपस्थित होते. वारंवार माइकवरून आवाहन केल्यानंतर पोलिस योग्य ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत आयोजक आणि स्वयंसेवकांनी बराचसा वाद िमटवला होता.

चोरट्यांची पाकीटमारी
मध्यस्थी करण्यासाठी आलेले माजी महाराष्ट्र केसरी गायकवाड यांनाही फटका बसला. त्यांच्या िखशातून महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली. गोंधळाचा फायदा घेत चोरट्यांनीही अनेकांच्या खिशावर हात साफ केला. गोंधळ घालणाऱ्या युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
बातम्या आणखी आहेत...