Home »Maharashtra »Vidarva »Akola» Filing A Complaint Against Husband And Wife In Case Of Illegal Loan

अवैध सावकारी करणाऱ्या पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीच्या व्यवहारासंदर्भात अवैध सावकारी चौकशी अहवालावरून ऑक्टोबर रोजी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये बोर्डी येथील पती-पत्

प्रतिनिधी | Oct 11, 2017, 11:28 AM IST

  • अवैध सावकारी करणाऱ्या पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
अकोट- शेतीच्या व्यवहारासंदर्भात अवैध सावकारी चौकशी अहवालावरून ऑक्टोबर रोजी अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये बोर्डी येथील पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बोर्डी येथील चंद्रभान पांडुरंग ढोले अन्नपुर्णा चंद्रभान ढोले यांच्याकडून ज्ञानदेव रामचंद्र पोटे यांनी २० हजार रुपये घेऊन तारण म्हणून कासोद येथील शेतकरी शेतीची खरेदी करून दिली होती. त्यानंतर पोटे यांनी घेतलेली रक्कम परत केल्यावरही त्यांची जमिन परत त्यांच्या नावावर करून दिली नाही.

या प्रकरणी पोटे यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणाच्या चौकशी अंती सदर शेतीचा व्यवहार हा अवैध सावकारीचा असल्याने सहकारी अधिकारी मोहन सुधीर गवई यांनी अकोट ग्रामीण पोलिसात चौकशी अहवालासह फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपी चंद्रभान ढोले अन्नपूर्णा ढोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Article

Recommended