आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर मैदान झाले मोकळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मुधोळकर पेठ येथील युवक क्रीडा मंडळाच्या मैदानावर उभी करून ठेवण्यात आलेली यंत्रे गुरुवारी मालकांनी हटविल्यामुळे मैदान मोकळे झाले आहे. या मैदानावर यंत्रे वाहने उभी केल्यामुळे मैदानाला वर्कशाॅपचे स्वरूप आले होते. यामुळे परिसरातील खेळाडूंना अडचण निर्माण झाली होती. याबाबतचे वृत्त दैनिक दिव्य मराठीने गुरुवारच्या अंकात प्रकाशित केल्यानंतर संबंधित मालकांनी तातडीने ही वाहने हटवल्याने खेळाडूंनी समाधान व्यक्त केले आहे.
गत सहा महिन्यांपासून मातीतील खेळांची परंपरा जपणाऱ्या मुधोळकर पेठ येथील मैदानावर ट्रक, ट्रॅक्टर, रोलर, जेसीबीसारख्या वाहनांची दुरुस्ती केली जात होती. त्यामुळे खेळाडू, ज्येष्ठ नागरिका युवक क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. याची तमा बाळगता वैयक्तिक स्वार्थासाठी मैदान खराब करण्यात आले. आता नव्याने या मैदानाची दुरुस्ती स्वच्छता करावी लागणार असली तरी मैदान मोकळे झाल्यामुळे खेळाडू मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मैदानावरील मोठी यंत्रे बाहेर निघाल्यामुळे आता मैदानाचा आकारही मोठा झाला आहे. त्यामुळे कबड्डी, खो-खो, आट्यापाट्या डाॅजबाॅल या खेळांचे एकापेक्षा जास्त सामने एकाचवेळी मैदानावर घेतले जातील तसेच प्रेक्षक आणि खेळाडूंनाही येथे बसण्यासाठी जागा तयार झाली आहे. भविष्यात परिसरातील नागरिक किंवा अन्य कोणीही मैदानाचा वैयक्तिक कामांसाठी वापर करू नये, असे आवाहन करणारे फलक मैदानात लावले जाणार आहे.

जिल्हास्तरीय खो-खो आॅक्टोबरपासून
स्पर्धा आॅक्टोबरपासून: मुधोळकर पेठ मैदानावर येत्या आॅक्टोबरपासून जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वीच मैदान मोकळे झाल्यामुळे आता एकाचवेळी दोन ते तीन सामने खेळले जाऊ शकतात. जर अतिक्रमण हटले नसते तर एकच सामना होऊ शकला असता.
बातम्या आणखी आहेत...