आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीमुळे गॅस सिलिंडरचा स्फोट; आठ झोपड्या खाक- शॉर्ट सर्किटमुळे लागली आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परतवाड्यात झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीमध्ये आठ घरांसह अनेकांच्या स्वप्नांचीही राखरांगोळी झाली.)
परतवाडा- शहरातील मध्यवर्ती भागात छत्रपती शिवाजी व्यापारी संकुल आठवडी बाजार परिसरात असलेल्या झाेपडपट्टीत सोमवारी २५ एप्रिलला सुनील उंबरकर यांच्या घरात शॉर्ट सर्कीटमुळे लागलेल्या आगीनंतर झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे आठ झोपड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने सकाळी साडेअकराच्या सुमारास लागलेल्या या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र डोळ्यांसमक्ष झालेल्या संसाराची राखरांगोळी पाहताना सर्वत्र आक्रोश दिसून येत होता.
जयस्तंभ चौक ते बसस्थानक मार्गावरील आठवडी बाजारातील झोपडपट्टीतील सुनील उंबरकर यांच्या घराला साेमवारी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागील. त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने तुळशीराम कदम, सुनीता भगवान मोरले, अनिल उंबरकर, आकाश उंबरकर, नानी उंबरकर, नंदु हट्टेल, संजय डोंगरे, सुनील डोंगरे यांची घरे जळून खाक झाले. आगीचे उसळणारे डोंब धूर यामुळे संपूर्ण परिसर काळाकुट्ट झाला होता. अचलपूर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने वेळेवर पोहोचून आग आटोक्यात आणली. या परिसरात ४० ते ५० झाेपड्या असल्याने पुढील अनर्थ टाळला. या घटनेची माहिती िमळताच अग्निशमन दल, तहसीलदार, ठाणेदार, इतर सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले होते.

सावळीदातुरा येथे लागली आग : याशिवायपरतवाडा-अंजनगाव मार्गावरील सावळी दातुरा ग्रामपंचायतीतील वाॅर्ड क्रं. खेलतपमाळी येथील चिरंजीलाल काचोले (५४) यांच्या घराला सोमवारी २५ एप्रिलला आग लागली. त्यामध्ये दोन दुचाकींसह गोठ्यातील शेतीपयोगी साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थांनी सहकार्य करीत आग आटोक्यात आणली. ही आगही घरावरून गेलेल्या विद्युत तारांमुळे लागल्याची गावात चर्चा आहे.