आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरी-खानमपूर शेतशिवारात आग,आगीत सात घरे खाक,शेतमालाचे नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पथ्रोट - येथून चार कि.मी. अंतरावर असणाऱ्या पांढरी खानमपूर शेतशिवारात मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास शाॅर्टसर्किट होऊन आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी लाखो रुपयांचा कांदा जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीमुळे दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागली होती.
प्राप्त माहितीनुसार, रात्री साडेसातच्या सुमारास परिसरातील पांढरी-खानमपूर शेतशिवारातील जगनलाल कारंजेकर यांच्या शेतात शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी धुऱ्यावरील चार लिंबाची झाडे, जवळचे ठेवलेले इंधन जळून खाक झाले. याशिवाय त्यांच्या शेतातील तीन एकरांतील कांदा जळाल्याने त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, शेताला लागूनच असलेल्या अन्य शेतांमधील शेतकऱ्यांचे इंधनाचे ढीग जळून खाक झाले. दरम्यान, ग्रामस्थांनी खासगी टँकरने नागरिकांनी आग आटोक्यात आणली. अग्निशमन दल येईपर्यंत नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. उर्वरित.पान
तालुक्यातील जामगाव खडका येथे अचानक सात घरांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता घडली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, संसारोपयाेगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेमुळे अनेकांचे संसार उद‌्ध्वस्त झाले असून, अर्ध्या एकरातील शेताचेही नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार कमलाकर देशमुख यांनी दिली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

बेनोडा शहीद पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या जामगाव खडका येथे बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास देवल हरीसिंग उईके, वासुदेव भिस्का वाडिवे, शिवाराम मंगल कुडसिंगे, लीलाबाई सुखदेव तिडकाम, रामदास बाजी धुर्वे, बाजी मरकाम धुर्वे, देवराव मंगल कुडसिंगे यांच्या घरांना अचानक आग लागली. या आगीमध्ये सातही घरांतील कपडे, धान्य इतर जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले. घटनेची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली. महसूल प्रशासनाने याची दखल घेऊन नायब तहसीलदार कमलाकर देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. तलाठी अरुण गवई, कोतवाल मोहन ठाकरे यांनी घटनेचा पंचनामा केला. या आगीने उग्र रूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण राखणे स्थानिक प्रशासनाला कठीण झाले होते. परिणामी, वरुड नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी बोलावण्यात आली, परंतु ती वेळेवर पोहोचू शकल्याने आजूबाजूच्या घरांनीही पेट घेतला. एवढेच नाही, तर घरांना लागून असलेल्या शेतातील अर्धा एकर अद्रकाचेही नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली. दरम्यान, अागग्रस्तांना तत्काळ शासकीय मदत मिळू शकल्याने देवेंद्र भुयार यांच्यासह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गावामध्ये झोळी फिरवून लोकवर्गणी केली. जवळपास दहा हजार रुपये या वेळी गोळा करण्यात आले. आगग्रस्तांना ताबडतोब दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली. या वेळी ग्रामस्थ परिसरातील नागरिकांनी आग शेतातील आगीने रौद्र रूप धारण केल्याने शेतमालाचे नुकसान झाले.
बातम्या आणखी आहेत...