आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायर येथील SBIच्या शाखेला शॉटसर्कीटमुळे आग; संगणकांसह 2 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी तालुक्यातील कायर येथील SBIच्या शाखेला शॉटसर्कीटमुळे आग लागल्याची घटना सकाळी 9 वाजता घडली. - Divya Marathi
वणी तालुक्यातील कायर येथील SBIच्या शाखेला शॉटसर्कीटमुळे आग लागल्याची घटना सकाळी 9 वाजता घडली.
नागपूर/यवतमाळ- वणी तालुक्यातील कायर येथील SBIच्या शाखेला शॉटसर्कीटमुळे आग लागल्याची घटना सकाळी 9 वाजता घडली. या आगीत बॅंकेतील 2 एसी, 2 संगणक, लॅपटॉप, स्कॅनर मशीन आणि एक कॅश काउंटर जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 
आगीत अंदाजे 2 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे लागलेल्या आगीत कोणतीही कागदपत्रे जळाली नाहीत. सकाळची वेळ असल्याने बॅंकेचे कामकाज बंद असल्याने लागलेली आग उशीरापर्यंत कळाली नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती
 
 
बातम्या आणखी आहेत...