आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरच्या सीबीआय कार्यालयाला आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - उपराजधानीतील सीबीआय कार्यालयाला बुधवारी सकाळी भीषण आग लागली. त्यात अनेक महत्त्वाच्या दस्तऐवजांसह संगणक, सीपीयू, प्रिंटर, अलमारी खाक झाली. पाच राज्यांच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या गैरव्यवहारासंबंधींच्या दस्तऐवजांचाही यात समावेश असल्याची माहिती हे.

बुधवारी सकाळी ६.३० च्या सुमारास कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला मोठ्या प्रमाणात धूर दिसला. यानंतर त्याने कार्यालयात जाऊन बघितले असता मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसले. सुरक्षा रक्षकाने ताबडतोब अधिकाऱ्यांना आग लागल्याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी अग्निशमन विभाग आणि गिट्टीखदान पोलिसांना कळवले. सीबीआयच्या कार्यालयाला आग लागल्याने पोलिस आणि अग्निशमन विभागाची यंत्रणा तातडीने हलली. जवळपास दोन तासांच्या परिश्रमानंतर अग्निशमन विभागाला आग आटोक्यात आणण्यात यश आले. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी मुद्दाम आग लावल्याचा संशयही व्यक्त होत आहे.

रेकॉर्ड सुरक्षित असल्याचा दावा
आगीनंतर सीबीआयच्या कार्यालयामध्ये प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला. सीबीआयचे अधीक्षक संदीप तामगाडगे यांना आगीसंदर्भात विचारण्यासाठी दूरध्वनी केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर पोलिस उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी सीबीआयची रेकॉर्ड रूम सुरक्षित असल्याचे सांगितले.
बातम्या आणखी आहेत...