आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोरक्षणाला आग, १५ जनावरे दगावली, वाघोली, रोहणखेडा येथे आग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - माहुलीचोर येथील गोरक्षणला आग लागून १५ जनावरे दगावल्याची घटना शनिवारी (दि. २३) दुपारी अडीच्या सुमारास घडली. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज लोणी पोलिसांनी वर्तवला आहे.

बडनेरा ते यवतमाळ रस्त्यावर जसापूर-चांदसुरा मार्गावर माहुली चोर परिसरात विधी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य अनिल लक्ष्मण जगताप यांच्या शेतात चार एकर जागेत हे गाेरक्षण असून त्यात जवळपास २२५ जनावरे आहेत. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास गोरक्षणाला अचानक आग लागली. त्यामध्ये १५ जनावरे दगावली. दगावलेल्या जनावरांमध्ये पाच वासरे, म्हशी उर्वरित गाईंचा समावेश होता. आगीमध्ये जनावरांसाठी असलेला कडबा सोयाबीनचे कुटार जळून राख झाले. यामध्ये जगताप यांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान गोरक्षणमधील माणसाने पोलिस कंट्रोल रुम जगताप यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चांदूर रेल्वे अमरावती येथून प्रत्येकी अग्नीशमन दलाची एकेक गाडी बोलावण्यात आली होती. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. घटनेची माहिती कळताच दुपारी उशीरा अप्पर पोलिस अधीक्षक राजा स्वामी, पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार वीरेंद्र जगताप तहसीलदार वाहूरवाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतले.

घटनेचा पुढील तपास ठाणेदार सी. एम. खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल भागवत नागपुरे करीत आहेत. या संदर्भात सखोल चौकशी करून नुकसानभरपाई देण्याचे निर्देश पालकमंत्री पोटे यांनी तहसीलदार वाहूरवाघ यांना दिले आहे.
शिरखेड - येथून जवळच असलेल्या वाघोली येथील शेतशिवारात शेताच्या धुऱ्याला आग लागल्याने संत्रा झाड बास जळून खाक झालेत. ही घटना शनिवारी (दि. २३) दुपारच्या सुमारास घडली. मात्र आग विझवण्याचे ग्राम पंचायतमधील यंत्र धुळखात पडल्याचे समोर आले. वाघोली येथील शेतकऱ्यांनी शेताच्या धुऱ्यावरील कचरा साफ करण्याच्या उद्देशाने तो पेटवून दिला. मात्र काही वेळातच या जळणाऱ्या कचऱ्याचे आगीत रुपांतर होऊन सुरेश वसंतराव तायडे यांच्या शेताच्या धुऱ्यावर असणारी ५० संत्र्यांची झाडे, गजानन मनोहर पुरतोडे यांची संत्र्यांची ४० झाडे बांबू जळून राख झाला. घटनेची माहिती पोलिस पाेलिस पाटील प्रवीण बेलखेडे यांना देण्यात आली. त्यांनी घटनेची माहिती चांदूर बाजार नगर परिषदेला देऊन अग्नीशमन दलाला पाचारण केले. या शिवाय रोहणखेडा येथील राजकुमार वानखडे यांच्या घराला आग लागून ३० क्विंटल कापूस अण्णाजी वानखडे यांचा क्विंटल कापूस जळाला.नागरिकांच्या अथक परिश्रमांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.