आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधान अंमलात आल्‍यानंतर पहिली फाशी नागपुरात; त्‍यापूर्वी गोडसे, आपटेंना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नथुराम गोडसे - Divya Marathi
नथुराम गोडसे
नागपूर - इंग्रज राजवटीत सन १८६४ मध्‍ये स्‍थापन झालेल्‍या नागपूर कारागृहाममध्‍ये १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील गुन्‍हेगार याकूब अब्दूल रझाक मेमन याला गुरुवारी फाशी दिली गेली. येथे आतापर्यंत एकूण 23 आरोपींना फाशी दिली असून, याकूब हा 24 वा ठरला आहे. याकूबपूर्वी नागपूर कारागृहात ५ नोव्हेंबर १९८४ रोजी येथे शेवटची फाशी दिली गेली होती. दरम्‍यान, स्‍वतंत्र भारताचे संविधान अंमलात आल्‍यानंतर पहिला मृत्‍यूदंडसुद्धा २५ ऑगस्ट १९५० रोजी सकाळी 7 वाजता नागपूर कारागृहातच दिला गेला होता. दरम्‍यान, भारताचे संविधान अंमलात येण्‍यापूर्वी महात्‍मा गांधी यांची हत्‍या करणा-या नाथूराम गोडसे आणि नारायण आपटे यांना आंबला जेलमध्‍ये 15 नोव्‍हेंबर 1949 रोजी फाशी दिली गेली होती. तो स्‍वतंत्र भारतातील पहिला मृत्‍यूदंड आहे.
पुढे वाचा - आपटे, गोडसेंना कसे लटकवले होते फासावर...