आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील पहिला विद्युत वाहन प्रकल्पाचे नागपुरात नितीन गडकरी यांच्या हस्ते उद््घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सरकारीवा निमसरकारी बससेवा तोट्यात चालत आहे. शिवाय इंधनाचा खर्च प्रदूषणही वाढत आहे. भविष्यात प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी देशात इलेक्ट्रिक कार निर्मितीवर भर देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. देशातील पहिला विद्युत वाहन प्रकल्प तसेच ओला इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचे उद््घाटन शुक्रवारी गडकरींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विमानतळावर झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर नंदा जिचकार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सर्व लाेकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. 

इंधन आयातीत आपला खूप पैसा खर्च होतो. प्रदूषणाची समस्याही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याला इलेक्ट्रिक वाहतूक हा सक्षम पर्याय आहे. भारतीय वाहतूक व्यवस्थेत चांगली सुधारणा करण्यासाठी लंडनच्या ट्रान्सपोर्ट फाॅर लंडन या सरकारी कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला असल्याचे गडकरींनी सांगितले. 

डिसेंबरमध्ये देशात पहिली इलेक्ट्रिक व्हेईकल पॉलिसी येणार अाहे. त्याचाच एक भाग म्हणून पायलट प्रोजेक्टसाठी नागपुरची निवड करण्यात आली आहे. त्या नंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतर शहरांत या गाड्या धावतील, असे ते म्हणाले. या वेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेरोजगार इलेक्ट्रिकल अभियंत्यांना चार्जिंग स्टेशनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले. या बाबत लवकरच सर्वसमावेशक धाेरण जाहीर करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. 

तासात टॅक्सीचे चार्जिंग 
या१०० टॅक्सीमुळे १३७ टन कार्बनडायआॅक्साईड तयार होण्यापासून वाचते. तर १०० वाहने ६५१४ झाडे लावण्याच्या बरोबरीचे असल्याची माहिती ओलाच्या अधिकाऱ्याने दिली. सर्वसाधारणपणे तास २० मिनिटांच्या चार्जिंगनंतर गाडी १४० किलोमीटर चालते. तर िवशेष चार्जरद्वारे दीड तासात चार्जींग होते. देशात पीपीपी बेसिस वर १२०० चार्जिंग पॉईंट्स लावण्यात आले आहे. २०३० मध्ये ३.९ लाख कोटींची इंधन बचत करण्याची केंद्राची योजना आहे. 
बातम्या आणखी आहेत...