आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Environment Library Start At Nagpur In Maharashtra

राज्यातील पहिल्या पर्यावरण ग्रंथालयास नागपुरात प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- निसर्गप्रेमी वाचकांसाठी एकाच ठिकाणी पर्यावरणासंबंधीची पुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अरण्य पर्यावरण संस्थेने पर्यावरण वाचनालय सुरू केले. नंदनवन येथील संस्थेच्या कार्यालयात सुरू केलेल्या वाचनालयाची सुरुवात दीडशे पुस्तकांपासून केली. राज्यातील पर्यावरण िवषयाला वाहिलेले अशा प्रकारचे हे पहिलेच वाचनालय असल्याचा दावा
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राज मदनकर यांनी केला आहे.

पर्यावरणाचा असमतोल ही समस्या सर्वत्र भेडसावत आहे. या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न हाेतात तेव्हा पर्यावरण संरक्षणासाठी प्रयत्नरत कृतिशील माणसेच अत्यल्प असल्याचे लक्षात येते. यावरील साहित्य, पुस्तकेही िमळत नाही. ही उणीव दूर करण्यासाठी अरण्य पर्यावरण संस्थेतर्फे "अरण्य पर्यावरण ग्रंथालय’ सुरू केले. या वाचनालयात पर्यावरणासंबंधी पुस्तके असतील. समाजातील निसर्गप्रेमी मंडळींसाठी वाचनाचे दालन या माध्यमाने अरण्यने
उघडले आहे.

पुस्तक दानातून वाचनालय
दोन महिन्यांपूर्वी अरण्यच्या स्वयंसेवकांनी मित्रमंडळीला आव्हान करून त्यांच्याकडून जुनी पुस्तके मागवली. काहींकडून पुस्तके भेटस्वरूपातही मिळवून घेतली. मित्रांनी नव्या पुस्तकांसाठी मदत दिली. त्यातून १५० पुस्तकांचे पर्यावरण ग्रंथालय साकारले. मांडवसरनिला ग्रंथपूजन करून हेमंत पुरोहित व पर्यावरणतज्ज्ञ कल्पना वझलवार यांच्या हस्ते नंदनवन येथे अरण्यच्या कार्यालयात उद्घाटन केले. या वेळी राज मदनकर व अक्षय देशमुख उपस्थित होते.

विविध लेखकांची पुस्तके उपलब्ध
या वाचनालयात निसर्गायण, अरण्यगर्भ, विकासस्वप्न, पाणी ते पाणी, सम्यक विकास, प्रदूषण, जंगलांची दुनिया, कीटकांचे अद‌्भुत जग, सेंद्रिय शेतीकला, सारस क्रौंच, रानवा, सौर आरोग्य, आयुर्वेद व नक्षत्रवन, पक्षी जाय दिगंतरा यांसारख्या पुस्तकांशी मैत्री होईल.

पुस्तके दान करण्याचे अावाहन
ग्रंथालयाचे वाचक व्हा, आम्हाला पर्यावरणाची पुस्तके दान करा, असे आवाहन मदनकरांंनी केले. ग्रंथालय बुधवार, गुरुवारी सुरू राहील. पहिल्या ५० वाचकांना सदस्यता विनामूल्य आहे. माहितीसाठी ८९५६०८८४२३, ८९८३३११६९६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधा. या पर्यावरण ग्रंथालयातून अरण्यच्या उपक्रमांशी जुळू शकता.