बोरगावमंजू - शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारं कृत्य बुधवारी बोरगावमंजू येथील श्रीमती लीलाबाई केशवराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात घडलं. अकरावी-बारावीतील तब्बल ५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या मुलांना फी भरल्याने बुधवारी परीक्षागृहातून हाकलण्यात अाले होते. गुरुवारच्या दैनिक ‘दिव्य मराठी’मध्ये हे वृत्त ठळकपणे प्रकाशित झाल्यावर अापल्या कृतीची जराही तमा बाळगता शिक्षणसंस्थेने काही विद्यार्थ्यांना चक्क धमकावून दबाव टाकत असा प्रकार घडलाच नसल्याचे आधी लिहून घेतले आणि त्यानंतरच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात अाले.
दरम्यान, परीक्षेला बसू देण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांंनी सहायक शिक्षण उपनिरीक्षकांना गुरुवारी महाविद्यालयात चौकशीसाठी पाठवले.
गुरुवारी संस्थेने नमते तर घेतले, पण, कालपेक्षाही गंभीर प्रकार आज केला. परीक्षेचा पेपर देण्यापूर्वी काही विद्यार्थ्यांना धमकावत असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे लिहून घेतले. या प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी आलेले सहायक शिक्षण उपनिरीक्षक ए. ए. राठोड यांनी चाैकशी अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला अाहे. आता ते काय कारवाई करतात, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे. बोरगावमंजू येथील शासनमान्य कायम विनाअनुदानित श्रीमती लीलाबाई केशवराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात फी भरलेल्या मुलांना पेपरपासून वंचित ठेवले होते. प्राचार्या प्रीती नालट यांनी ५० पेक्षा जास्त विद्यार्थी, विद्यार्थिनींना प्रथम सत्र परीक्षेला बसू देता त्यांना वर्गाबाहेर काढले होते.
दरम्यान, आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत, या वर्षी पीक झाल्यामुळे आमच्याकडे पैसे नाहीत, असे विद्यार्थ्यांनी सांगितल्यावरही त्यांचे ऐकून घेण्यात आले नाही. व्यवस्थापन समिती अध्यक्ष नाजुकराव गमे यांनीही विद्यार्थ्यांचे ऐकले नाही. शेवटी विद्यार्थ्यांना परीक्षा देताच परतावे लागले होते. या प्रकाराबाबत पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, ते जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची भेट घेणार आहेत.
नि:पक्षपणे चौकशी
शिक्षणाधिकाऱ्यांनी मला चौकशीचे आदेश दिले. मी प्राचार्यांसह संपूर्ण शाळेचे कर्मचारी संबंधित विद्यार्थ्यांची नि:पक्षपणे चौकशी करून अहवाल तयार केला. तो शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याकडे देण्यात येत आहे. आत्माराम राठोड, सहायक शिक्षण उपनिरीक्षक.
संस्थेवर कारवाई करा
आम्ही अल्पभूधारक शेतकरी आहोत. पीक नाही, मजुरी नाही. दुष्काळात खायचे वांधे आहेत. ऐन परीक्षेच्या दिवशी मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्यात यावी. अनिल इंगळे, शेतकरी.
पुढे वाचा..