आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीडशे वर्षांत बुलडाणा जिल्ह्यात प्रथमच अ.भा. साहित्य संमेलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- दीडशे वर्षांत प्रथमच विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील विवेकानंद आश्रम संस्थेला ९१ वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा बहुमान मिळाल्याची माहिती अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली. संमेलनाध्यक्षांची निवड १० डिसेंबरला हाेईल. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम साहित्य मंडळाने रविवारी जाहीर केला. दरम्यान, हा निर्णय होण्यापूर्वीच काही उमेदवारांनी मतदारांशी संपर्क साधणे सुरू केले आहे.

गुरुवार, दि. ५ ऑक्टोबरला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे मतदारयादी देण्यात येईल. उमेदवार तसेच इच्छुकांना ही यादी त्याच दिवशी सायंकाळी ७ नंतर उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष जोशी यांनी दिली. अध्यक्षपदासाठी शनिवार, १४ आॅक्टोबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज देता येईल. त्याच दिवशी सायंकाळी ७ नंतर नावे जाहीर करण्यात येतील.
बातम्या आणखी आहेत...