आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूची अवैध वाहतूक, पाच आरोपींना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मोटारसायकलमधून अवैध मार्गाने दारूची विक्री करणाऱ्या पाच जणांना ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी रंगेहात पकडले. अंजनगाव सुर्जी ते अकोट मार्गावरील लखाड हद्दीतून अवैध मार्गाने दारूची वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता ही कारवाई केली.
प्रेम नारायण राय, ज्ञानेश्वर हिरे, रणजित भोकरे, राम उर्फ हेमंत खुशाल बर्वे (चारही रा. मोचीपुरा, अंजनगाव सुर्जी), देवानंद उर्फ दिनेश अरबाळ (२१, पानअटाई) असे ग्रामीण पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर यामधील बुधवारा येथील विकास गौर हा फरार आहे. दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) ८५ नुसार पाचही आराेपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून रोख २४ हजार ५०० रुपये, देशी दारूचे आठ बॉक्स १९ हजार २०० रुपये, १५ हजार रुपयांचा एक मोबाइल एक लाख किमतीच्या तीन दुचाकी असा एकूण लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनात अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार संजय लोहकरे, सहायक पोलिस निरीक्षक अभिजित अहिरराव, पोलिस कॉन्स्टेबल निरगुळे इतर पथकाने केली.
जप्त करण्यात आलेल्या दारूसह आरोपी तपास अधिकारी.
बातम्या आणखी आहेत...