आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुननगरातील ध्वज हटवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशावरून महापालिकेने सोमवारी पहाटे अर्जुननगर परिसरातील टेलिफोन कॉलनीत पोहोचून तेथील खुल्या जागेवर असलेला पंचशील ध्वज हटवला. एका समुदायाविरुद्ध सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचा आरोप करीत ध्वज पूर्ववत करण्यासाठी या नागरिकांनी मनपा आयुक्तांच्या कक्षात ठिय्या दिला.
दरम्यान, मंगळवारच्या आमसभेत या विषयावर चर्चा करून त्या जागेवर ग्रंथालय किंवा प्रेक्षागृह बांधण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याने ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.आंदोलनकर्त्यांचा ठिय्या आणि कार्यकर्त्यांची शब्दफेक सुरू असतानाच बडनेरचे नगरसेवक जावेद मेमन यांनी यशस्वीपणे मध्यस्थी केली. दुसरीकडे ठिय्या आंदोलन करणारे बसपचे नगरसेवक इतर नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी गटनेत्याला भेटत होते. मंगळवारी वेळेवरचा विषय म्हणून चर्चेला येणाऱ्या या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या पदाधिकारी असलेल्या महिला नगरसेवक प्रा. डॉ. प्रदीप दंदे (रिपाइं), जावेद मेमन (राकाँ फ्रंट) दीपक पाटील, गुंफा मेश्राम, निर्मला बोरकर (तिन्ही बसप) यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, राकाँ फ्रंटचे गटनेते अविनाश मार्डीकर, भाजपचे गटनेते संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, अल्का सरदार, भूषण बनसोड, विजय नागपुरे यांनी या विषयाला पाठिंबा दिला आहे.

मनपाच्या प्रभाग क्रमांक मधील शेत सर्व्हे क्रमांक १६५/२ मध्ये रीतसर ले-आउट पाडण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते या भागातील ८० ते ९० टक्के रहिवासी एका विशिष्ट धर्माचे आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांना पूजनीय असलेला ध्वज त्या ले-आउटमधील खुल्या जागेवर उभारला होता. दरम्यानच्या काळात कुणीतरी त्याविरुद्ध तक्रार केली आणि त्या तक्रारीला अनुसरून पुढे हा मुद्दा लोकायुक्तांपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, या आदेशानंतर मनपा प्रशासनाने स्थानिक नागरिकांशी बोलणी करून आपसात हा मुद्दा सोडवता सूडबुद्धीने ही कारवाई केली,असा आरोप करून इतर धर्मांची अतिक्रमित प्रार्थनास्थळे पाडल्याखेरीज दालनातून बाहेर पडणार नाही,अशी नगरसेवक दीपक पाटील निर्मला बोरकर, बसपचे राजीव बसवनाथे, विनायक भुरभुरे, प्रदीप महाजन आणि सुदाम बोरकर यांनी घेतली होती. या आंदोलनात फुले महिला मंडळाच्या अध्यक्ष अर्चना गोसावी, प्रतिभा मेश्राम, सुषमा रामटेके, सुलोचना मेश्राम, अलका गडलिंग, कविता सोनटक्के, त्रिवेणी मकेश्वर, रंजना गोवर्धन, शशिकला आकोडे, बेबी वाहाणे, प्रतिभा मेश्राम, अंतकला वाहाणे, संगीता बागडे, रेखा गजभिये, यशोधरा डोंगरे, कल्पना रामटेके, शिला मेश्राम, कल्पना मेश्राम, मंदा गवई, शोभा कठाणे, रजनी गुळधेकर अादी महिला सहभागी झाल्या होत्या.

नाहीतर माझ्यावर झाली असती कारवाई
^लोकायुक्तांच्या आदेशानुसार२० जानेवारीच्या आत ध्वज हटवला नसता तर माझ्यावरच कारवाई झाली असती. त्या आदेशाचे पालन करणे गरजेचे होते. शिवाय ध्वज हटवताना कोणताही अडथळा येऊ नये नागरी जीवन बाधित होऊ नये म्हणून पहाटेच कारवाई केली. चंद्रकांत गुडेवार, आयुक्त,मनपा. अमरावती.