आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : यवतमाळमध्‍ये कार वाहून गेली; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्‍यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरामुळे मृत्‍यू झालेले आजनकर कुटुंबातील तीन सदस्‍य - Divya Marathi
पुरामुळे मृत्‍यू झालेले आजनकर कुटुंबातील तीन सदस्‍य
यवतमाळ - सलग तीन दिवसांपासून विदर्भात अतिवृष्‍टी होत आहे. त्‍यामुळे नदी नाल्‍यांना पूर आला असून, अर्वी - यवतमाळ रोडवर बिल्दोरी पुलावरून एक ऑल्‍टो कार वाहून गेल्‍याची घटना काल (बुधवारी) मध्‍यरात्री घडली. या कारमध्‍ये यवतमाळमधील प्रगतीनगरातील एकाच कुटुंबातील चौघे जण असून, आज (गुरवारी) त्‍यांचे मृतदेह सापडले. संजय गोविंद आजनकर, गजानन गोविंद आजनकर, गायत्री गोविंद आजनकर आणि श्रावणी गजानन आजनकर (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. यवतमाळच्‍या शासकीय रुग्‍णालयात दुपारी 12 वाजताच्‍या मृतदेहाचे शवविच्‍छेदन सुरू होते.
यवतमाळमधील आजणकर कुटुंब त्‍यांच्‍या कारने अर्णीकडून यवतमाळकडे येत होते. दरम्‍यान, बिल्दोरी जवळ असलेल्‍या ओढ्यावरील पुलावर पाणी वाहत होते. आजणकर यांची कार पुलावर येताच पुराचा जोरदार लोंढा आला यात कार वाहून गेली. काही कळायच्‍या आत हे संकट ओढावल्‍याने आजाणकर कुटुंबाला कारमधून बाहेर पडता आले नाही. जिल्‍हा प्रशासनाने आपत्‍ती व्‍यवस्‍थान कक्ष आणि अग्‍नीशमन दलाच्‍या मदतीने रात्रभर शोध मोहीम राबवली. दरम्‍यान, गुरुवारी पाहाटे पूर ओसरल्‍यानंतर घटनास्‍थाळापासून दोन किलोमीटर अंतरावर कार आढळून आली. त्‍यात आजणकर कुटुंबातील चौघांचाही मृतदेह सापडला. त्‍यामुळे शोककळा पसरली आहे.
अकोल्‍यामध्‍ये तिघे बेपत्‍ता
अकोला -
अकोला जिल्ह्यातील उमा, निर्गुणा, काटेपूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने नद्यांना पूर आला असून, त्यात बाळापूर, अकोट व तेल्हारा तालुक्यांतील तिघे बेपत्ता
झाले आहेत. पुरामुळे पूर्णा नदीच्या पुलावरून जवळपास १४ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे अकोट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. तळेगाव डवला व तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, जुनी उमरी, पिवंदळ, धामणा व अंदुरा अशा आठ गावांचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. येवता, निमकर्दा व बटवाडीत पावसाने नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील ४८ तासांत आणखी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
जळगाव जिल्ह्यात महिला वाहून गेली
जळगाव जिल्ह्यात बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू होती. पाच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. हतनूर धरणाचे ४१ दरवाजे एक मीटरने उघडून विसर्ग केला जात होता. ऐनपूर येथील श्यामाबाई राजाराम महाजन (वय ७०) या वृद्ध महिलेचा बुधवारी तापी नदीच्या पुरात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला. ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. रावेर तालुक्यातील अजनाड, विटवे, निंबोल, ऐनपूर या गावांचे रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला होता.

मागील चौवीस तासांत असा पडला पाऊस
(बुधवार सकाळी 8 ते गुरुवार सकाळी 8पर्यंत)
अकोला 12.5 मिमी
अमरावती 12.8 मिमी
भंडारा 41.0 मिमी
चंद्रपूर 12.1 मिमी
नागपूर 00.3 मिमी
वाशीम 35.0 मिमी
वर्धा 03.7 मिमी
यवतमाळ 12.6 मिमी
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...