आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटात पकडली विदेशी दारू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘ड्राय डे’ असतानाही धारणी तालुक्यातील खापरखेडा या गावात एलसीबीच्या पथकाने पीएसआय आशिष बोरकर व त्यांच्या पथकाने धाड टाकून एका घरातून देशी व विदेशी दारुचा ४७ हजार ५२० रुपयांचा ऐवज जप्त करून दारुविक्रेत्यांविरुध्द गुन्हा दाखल केला.
 
मंगळवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होते. त्याच पार्श्वभुमिवर संपुर्ण जिल्ह्यात दारु विक्रीला बंदी घालण्यात आली होती. ‘ड्राय डे’ असल्यामुळे दारू विक्रीचे दुकानसुध्दा बंद होते मात्र धारणी तालुक्यातील खापरखेडा येथील बसंतलाल किशोरीलाल जायस्वाल (६०) हा अवैध देशी व विदेशी दारु तसेच बिअरची विक्री करत असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. 
बातम्या आणखी आहेत...