आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Formation Of Four Subject Committee In Municipal

महापालिकेमध्ये चार विषय समित्यांचे गठन, आमसभेत सदस्यांच्या नावांची झाली घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या चार विषय समित्यांवरील सदस्यांची निवड बुधवारी (दि.२०) झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. विधी, शहर सुधार, शिक्षण तसेच महिला बालकल्याण समितीवर प्रत्येकी अशा एकूण ३६ सदस्यांची निवड झाल्याची घोषणा महापौर चरणजित कौर नंदा यांनी केली. आता सभापती-उपसभापती निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची प्रतीक्षा आहे.
महाराष्ट्र प्रांतिक महापालिका अधिनियम १९४९ चे प्रकरण मधील कलम ३० नुसार विषय समित्यांचे गठन करण्यात आले. गटनेत्यांकडून विषय समित्यांवर सदस्यांची नावे देण्यात आली, नावे घोषित करताना सभागृहात विरोधाचा सूरदेखील दिसून आला नाही. त्यामुळे सर्व गटनेत्यांकडून सामोपचाराने सदस्यांच्या नावांचा विचार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. चार विषय समिती सभापती उपसभापतींचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे नव्याने विषय समित्यांचे गठन करीत सभापती उपसभापतींची निवड होणे गरजेचे आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. वर्तमान महापालिकेच्या अंतिम वर्षातील या विषय समित्या राहतील.

शिक्षण समिती
चंदूमल बिल्दाणी, सविता लाडेकर, सुजाता झाडे, अ. रज्जाक अ. रफीक, लुबना तनवीर, नूतन भूजाडे, मिलिंद बांबल, आरीफ हुसैन मुनाफ हुसैन, चेतन पवार.

महिला बालकल्याण समिती
कांचन उपाध्याय, सूवर्णा राऊत, कुसूम साहू, अर्चना इंगोले, शाहिस्ता अन्सारी, फहेमिदा नसरीन, निलिमा काळे, सारीका महल्ले, वंदना हरणे.

शहर सुधार समिती
छाया अंबाडकर, स्वाती निस्ताने, नितीन देशमुख, अर्चना राजगुरे, डॉ. कांचन ग्रेसपुंजे, राजेंद्र महल्ले, भूषण बनसोड, ममता अावारे, दिनेश बुब.

विधी समिती
हेमलता साहू, वनीता तायडे, राजू मसराम, सुनिता भेले, संगीता वाघ, मालती दाभाडे, ममता आवारे, मो. इमरान मो. याकूब, वंदना हरणे.