आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'नोटबंदी\' देशातील सर्वात मोठा घोटाळा, माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांची मोदी सरकारवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी नोटबंदीच्या निर्णयावरून मोदी सरकारवर घणाघातील टीका केली आहे. नोटबंदी हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

पी. चिदंंबरम यांनी नागपूूरात बोलताना सांगितले की, बॅंकेत पैसे नाहीत, नोटबंदीपासून सावरण्याची कुठलीच तयारी केली गेली नाही. कॅश उपलब्ध होण्यासाठी आणखी 7 महिन्यांचा कालावधी लागेल. 50 दिवसांत काहीही होणार नाही.

आणखी काय म्हणाले चिदंबरम?
- नोटबंदीने देशातील काळा पैसा संपला का? दहशतवाद्यांचे फंडिंग थांबले का? अशे प्रश्नही यावेळी पी.चिदंबरम यांनी उपस्थित केले.
- नोटबंंदीच्या देशाच्या जीडीपीवर अनंंत काळ प्रत‍िकूल परिणाम जाणावेेल. त्याचप्रमाणे आरबीआयच्या प्रोजेक्शनवर देखील याचा परिणाम दिसून येईल. नोटबंदीमुळे विकास दर 1-2 टक्क्यांनी कमी होईल, असे भाकीत अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
- या निर्णयाने उद्देश तर पूर्ण झालाच नाही. पण, देशातील गरीब होरपळून निघाले आहेत. मोठ्या नोटा चलनातून बाद करायच्या होत्या तर किमान एका वर्षाची मुदत द्यायला हवी होती, असे च‍िदंबरम यांनी सांगितले.
- 'मी एका लग्नात गेलो तेव्हा पाहिले की, नोटबंंदीच्या श्रीमंतांवर कोणताही परिणाम झालेला नाही. केेवळ याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. त्यांना पैशासाठी अक्षरश: भटकावे लागत आहे. भविष्यात मोदी सरकारचा हा निर्णय देशाचे कंंबरडे मोडणार ठरण्याची शक्यता आहे.
- आज जगात कोणता देश कॅशलेश आहे? अमेरिका, सिंगापूरने असे का नाही केले? देशात वीज कुठे आहे? ऑनलाइन मशिनी कुठे आहेत? असे अनेेक सवाल चिदंंबरम यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...