आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे झाले भूमिपूजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यात प्रामुख्याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दर्यापूर तालुक्यातील शिंगणवाडी-भुजवाडा रस्ता सुधारणेसह येवदा येथील गावतलावाच्या कामाचा समावेश होता.आमदार रमेश बुंदिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, संबंधित विभाग प्रमुख गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अचलपूर येथील येलकी सावळापूर रस्ता सुधारणेबाबतचे भूमिपूजन पालकमंत्र्यांनी केले. दर्यापूर तालुक्यातील घडा येथील पोच मार्गाची सुधारणा करण्याबाबतचे अंदाजे २२.५० लक्ष रुपये किंमत असलेल्या कामाचे भूमिपुजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. दर्यापूर तालुक्यातील खल्लार मलकापूर रस्ता सुधारणा करण्याबाबतचे अंदाजे किंमत ११९ लक्ष रुपये असलेल्या बांधकामाचे भूमिपूजन पोटे यांनी केले. अंजनगावसुर्जी तालुक्यातील विहीगाव ते रत्नापूर, कापूसतळणी रस्त्यांचे भूमिपूजनही त्यांनी केले. या कामावर सुमारे १८० लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे.
अंजनगावात कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन : युवक-युवतींच्या कलागुणांना वाव मिळावा त्यामाध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने अंजनगावसुर्जी येथे स्व. संजय गणेशपुरे स्किल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शामलेक्स मल्टीपर्पज स्कील सेंटरचे उदघाटन पालकमंत्री पोटे यांच्या हस्ते करण्यात आले.आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, संस्थेचे संचालक हेमंत धारस्कर, श्याम देवडे, सतीश लोणकर आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...