आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भानखेड जंगलात धमकी देवून युगूलास लुटणारे चार जण पोलिसांच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरात शिकणारा एक युवक त्याच्या मैत्रिणीला घेवून भानखेडच्या जंगलात फिरण्यासाठी गेला होते. या दोघांना एकातांत पाहून भानखेडा येथील चार युवकांनी त्यांना घेरले. यावेळी धमकी देवून या युगूलाकडून हजार ९०० रुपये जबरीने उकळले. दरम्यान त्याचवेळी पोलिसांचे दामिनी पथक या भागात गस्तीवर गेले. युवतीने आरडाओरड केल्यामुळे दागिनी पथकाने घटनास्थळ गाठले. तसेच घडलेल्या घटनेची माहीती बडनेरा पोलिसांना दिली. पोलिसांनी चौघांनाही पकडले आहे. ही घटना गुरूवारी (दि. १७) सायंकाळी घडली आहे. 

शहरातील एका महाविद्यालयात फार्मसीला शिकत असलेला एक युवक त्याच महाविद्यालयात फार्मसीला असलेली एक युवती हे दोघे गुरूवारी दुपारी भानखेडच्या जंगलात गेले होते. एका झुडूपामागे हे बसले होते. त्याचवेळी भानखेडा गावातील एक युवक त्या भागात आला. त्याला हे युगूल बसलेले दिसतात, त्याने आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांना आवाज दिला. त्यामुळे ते सुद्धा त्याठिकाणी पोहचले. या चौघांनीही या युगूलाला धमकावून त्यांच्याकडून खिशात असलेले हजार ९०० रुपये हिसकावून घेतले. हा प्रकार सुरूच असताना त्या भागातून महीलांच्या दामिनी पथकाची गस्त सुरू होती. दरम्यान युवतीने आरडाओरड केल्यामुळे दामिनी पथकाने जंगलात धाव घेतली. पोलिस येत असल्याचे दिसताच चौघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. सदर घटनास्थळ हे बडनेरा पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे दामिनी पथकाच्या पोलिसांनी तत्काळ ही माहिती त्यांना दिली. 

पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवून सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास चारही लुटारूंना ताब्यात घेतले होते. या प्रकरणी गुरूवारी रात्री बडनेरा पोलिस ठाण्यात धमकी देवून वाटमारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे बडनेरा पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या चौकडीकडून अजूनही काही गुन्हे उघड होणार का, याबाबत पोलिस तपास करत आहेत. शहरासह जिल्ह्यात चिखलदऱ्यासह शहराच्या जवळही वडाळा भागात एकांतात मैत्रिणीला घेवून फिरण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रेमी युगुलाला धाक दाख‌वून लुटण्याचे प्रकारही अनेकदा घडत असतात. मात्र बदनामीपोटी अनेकजण बाहेर याबाबत वाच्यता करणे टाळतात. आजच्या या घटनेमुळे युवक, युवती तसेच सहकुटुंब जंगलात बाहेर फिरायला जाणाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. 

रोकड केली जप्त 
युवक-युवतीला धमकी देवून रक्कम लुटणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. युगूलाकडून लुटलेले हजार ९०० रुपये ताब्यात घेतलेल्या चौघांकडून जप्त करण्यात आले आहे. दिलीपपाटील, ठाणेदार, बडनेरा. 
बातम्या आणखी आहेत...