आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेफ्टी टँकमध्‍ये गुदमरून चौघांचा मृत्‍यू, एकमेकांना वाचवण्‍याच्‍या प्रयत्‍नात दुर्घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - हिंगणा त‍हसिलमधील एमआयडीसी परिसरात सिवर टँक स्वच्छ करताना विषारी वायूने चार सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. यामध्‍ये पिता- पुत्राचा समावेश आहे. एकमेकांना वाचवण्‍यासाठी हे कामगार टँकमध्‍ये उतरले होते. त्‍यापैकी एकावर उपचार सुरू असल्‍याची माहिती मिळाली आहे. चार ठार एक जखमी..
- ए. सुनील वाल्‍मिकी, रिक्‍की वाल्‍मिकी या पिता- पुत्रांचा मृतांमध्‍ये समावेश आहे.
- दोघेही वैशालीनगरचे रहिवाशी आहेत. येथीलच सुमीत चव्‍हाण या घटनेत मृत्‍यूमुखी पडला.
- मृतांमध्‍ये इंदिरा मातानगर येथील बाल्‍या मसादे याचा समावेश आहे.
- वैशालीनगरच्‍या प्रमोद हरिया चव्हाण यांना लता मंगेशकर हॉस्‍पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले आहे.
अशी घडली घटना..
- मंगळवारी हे पाचही जण फेस दोनमधील 'यु २' या रॉ हाऊसमध्ये सेफ्टी टँक साफ करत होते.
- सेफ्टी टँकचे झाकण उघडल्‍यानंतर त्‍यांनी आतमधील विषारी गॅस बाहेर निघू दिला, नंतर आत प्रवेश करण्‍याचे ठरवले.
- मात्र, काही वेळातच एकजण आत शिरला, त्‍याचा श्‍वास गुदमरू लागला.
- त्याला वाचविण्यासाठी दुसरा व त्‍याला वाचविण्यास तिसरा असे पाचही मजूर आत शिरले.
- दरम्‍यान चौघांचा मृत्‍यू झाला तर, एकजण गंभीर आहे.
बातम्या आणखी आहेत...