धुळे : तालुक्यातील अनकवाडी येथे आज (शनिवार) स्वातंत्र दिनाच्या अनुषंगाने आयोजित ग्रामसभेत प्रश्न का विचारलेत या कारणावरून, सत्ताधारी गटाने दुस-या गटावर सशस्त्र हल्ला केला. यात एकाच कुटुंबातील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू हेत. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहेत. विनायक खुळे, दीपक खुळे, शिवाजी खुळे, कौतिक खुळे, प्रवीण खुळे, नंदू खुळे अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर बाजूच्या घरातून कोयता आणून वार करण्यात आलेत.