आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार विषय समित्यांचे लवकरच होणार गठन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - महापालिकेच्या चार विषय समितींचे लवकरच गठन केले जाणार आहे. आगामी सर्वसाधारण सभेत सदस्यांच्या नावांची घोषणा करीत विषय समित्यांचे गठन केले जाईल. अंतिम वर्षात सभापतिपदासाठी जोरदार रस्सीखेच होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
महापालिकेच्या शहर सुधार, विधी, शिक्षण तसेच महिला बालकल्याण समितीचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे मिनी महापौरपदाच्या निवडणुकीनंतर विविध विषय समितीच्या गठनाकडे महापालिकेतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सद्य:स्थितीत महिला बालकल्याण समिती तसेच शिक्षण समितीचे सभापतिपद काँग्रेसकडे आहे. विधी शहर सुधार समिती सभापतिपद राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटकडे आहे. स्थायी समिती सभापतिपदावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटमध्ये बरीच तनातनी झाली, मात्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडूनच अविनाश मार्डीकर यांच्या नावाचा व्हिप जारी करण्यात आला होता. त्यामुळे रावसाहेब शेखावत गटाची पार नाचक्की झाली होती. मात्र, मिनी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीने सामंजस्याने निर्णय घेतल्याचे दिसून आले. पाचही झोन सभापतिपदाची निवड अविरोध झाल्याने अंतर्गत राजकारण शमले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. मिनी महापौरपदाची निवडणूक होत नाही तोच, विषय समित्यांच्या निवडणुका समोर आहेत. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस तसेच अन्य पक्षांमध्ये अंतर्गत घमासान होण्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी विषय समिती गठन करतेवेळी काँग्रेसमध्येच अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत विषय समितीकरिता सदस्यांची नावे घोषित झाल्यानंतर सभापती उपसभापतिपदाचे चित्र स्पष्ट होईल.

विद्यमान पदाधिकारी
समितीसभापती उपसभापती
विधीबिल्कीस बानो हमजा खान सुनीता भेले
शिक्षण अ. रफीक अ. रज्जाक मो. इमरान असरफी
शहर सुधार भूषण बनसोड मालती दाभाडे
महिला,बालकल्याण संगीता वाघ जयश्री मोरे