आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बीटी’च्या नावावर चार प्रकारचे बनावट बियाणे बाजारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बीटीकॉटनच्या नावाखाली चार प्रकारचे बनावट बियाणे या वर्षी बाजारात येण्याची भीती खुद्द कृषी विभागाने व्यक्त केली अाहे. दरम्यान, हे चारही बियाणे अप्रमाणित असून, त्यामुळे शेताचे पर्यावरणाचे नुकसान होईल. परिणामी, ते खरेदी करू नये, असे विभागीय कृषी सहसंचालकांचे म्हणणे आहे.
राउंडअप बीटी, तणावरची बीटी, विडगार्ड बीटी तणनाशक बीटी ही बनावट बीटी कॉटनची नावे आहेत. बाजारातही ती याच नावाने विक्रीस येऊ शकतात, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. मात्र, हे चारही ब्रँड अप्रमाणित असून, त्याची पेरणी केल्यास जमिनीचा पोत खराब होण्यासोबतच पर्यावरणालाही धोका पोहोचू शकतो, असे या विभागाचे निरीक्षण आहे. त्यामुळे हे बियाणे खरेदी करू नये, शिवाय त्याची विक्री करणाऱ्यांची माहिती कृषी विभागाला कळवावी, असे आवाहनसुद्धा विभागीय कृषी सहसंचालक तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.
बियाणे खतांमधील भेसळ, ते अप्रमाणित असणे, बियाण्यांची उगवण क्षमता पुरेशी नसणे, पेरणीनंतर लगेच कीड लागणे असे प्रकार दरवर्षी घडत असतात. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने योग्य ती काळजी घेतली असून, आधीपासूनच शेतकऱ्यांना सतर्क करण्याचे ठरवले आहे. बीटी बियाण्यांमधील बनावट ब्रँडची माहिती हा त्याचाच एक भाग असून, शेतकऱ्यांनी सावध व्हावे, यासाठी या विभागाची यंत्रणाही दक्ष झाली आहे.

बीटी बियाण्यांचा वापर सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरला आहे. बीटी हे अधिक उत्पादन देणारे वाण असल्यामुळे त्याला अन्नद्रव्यही अधिक लागते. त्यामुळे जमिनीतील पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणात शोषून घेतले जातात. या अतिशोषणामुळे स्वाभाविकच जमिनीचा पोत खराब होतो. तो भरून काढण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा लागतो. हा वापर वेळीच झाल्यास जमीन निकस बनते, असे कृषी शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

...थेट फौजदारी कारवाई
बनावटबीटी बियाण्यांची विक्री केल्यास संबंधितांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे. १९८३ च्या बियाणे नियंत्रण कायद्यान्वये ही कारवाई केली जाणार असून, त्यामध्ये दंड शिक्षेची तरतूद आहे. यासाठी १८००२३३४००० या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधता येतो, असे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी कळवले आहे.