आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएमचा क्रमांक विचारून फसवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राजापेठठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या मोबाइलवर फोन करून बँकेतून बाेलत असल्याची बतावणी करून एटीएम क्रमांक विचारला. त्याआधारे महिलेच्या खात्यातून २६ हजार रुपये काढून फसवणूक केली. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून बुधवारी राजापेठ पोलिसात तक्रार दाखल केली. एका महिलेच्या मोबाइलवर १४ जुलैला सायंकाळी एका मोबाइल क्रमांकावरून फोन आला. या व्यक्तीने आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएमचा क्रमांक विचारला. या क्रमांकाच्या आधारे त्या व्यक्तीने महिलेच्या बँक खात्यातून २६ हजार १६ रुपये काढले. पोलिसांनी तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी अशा प्रकारे फसवणुकीचे अनेक प्रकार शहरात घडले आहे. फसवणुकीनंतर पोलिस गुन्हा दाखल करतात. मात्र, आजपर्यंत शहर पोलिसांनी अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा शोध घेतलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...