आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कागदपत्र; सूत्रधारासह एकास अटक, पाचही आरोपींना मिळाली बुधवारपर्यंत कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - तालुक्यातील चांदूर जहानपूर येथील सरपंच पोलिस पाटील यांच्या सही शिक्क्याचा वापर करून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह अन्य एकाला रविवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली. पंकज साहेबराव दुधंडे (२७, रा. लासूर )असे मुख्य सूत्रधाराचे नाव असून साखरू सखाराम येडणे (२१,रा. निळे ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर ) असे अटक केलेल्या दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.
मुख्य सूत्रधार दुधंडे याला अकोला नजिकच्या आपोटी येथून तर येडणे याला फलटण येथून सापळा रचून रविवारी उशीरा रात्री अटक केली. ही कारवाई सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल आठवले, कॉन्टेबल सिद्धार्थ आठवले, प्रशांत ढोके, पोलिस मित्र जाकीर हुसेन यांनी पार पाडली.
या प्रकरणी चांदूर जहानपूर येथील पोलिस पाटील योगेश वानखडे यांनी ११ जून रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अमोल विश्वास पाटील, दिनेश दुधंडे, अनिल हिम्मत दुधंडे, देवानंद हिम्मत दुधंडे, साखरू सखाराम येडगेे यांच्यासह इतर चार ते पाच अनोळखी इसमांवर गुन्हे दाखल केले होते. तब्बल बारा दिवसांनी यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि. २७) पोलिस कोठडी सुनावली होती. रविवारी अटक केलेल्या दोन आरोपींसह पूर्वीच्या तीन आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाचही आरोपींना बुधवारपर्यंत (दि. २९) पोलिस कोठडी सुनावली.

बनावट कागदपत्रांच्या प्रकरणातील अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत असून तपासामध्ये अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुढील तपास ठाणेदार नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...