आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक आमदार निधीच्या संगणक वाटपात घोटाळा, जिल्ह्यातील २९ शाळांना संगणक मिळालेच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शिक्षक आमदार विकास निधीतून मंजूर झालेले सुमारे ५५ लाख रुपयांचे संगणक जिल्ह्यातील २९ शाळांना वाटप करताच कंत्राटदाराने रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे बिल टाकले असल्याचा आरोप शिक्षक संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी शनिवारी (दि. ११) पत्रकार परिषदेत केला.

शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत सॅप इन्फोकॉम या कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील २९ शाळांना संगणक, प्रिंटर यूपीएस असे साहित्य पुरवणे आवश्यक होते. यासाठी ५५ लाख ५३ हजार ४६४ रुपयांचे साहित्य मंजूर करण्यात आले होते. परंतु, वास्तवात संबंधित साहित्य जिल्ह्यातील शाळांना मिळालेच नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, पुरवठादार कंत्राटदाराने संगणक साहित्याचा पुरवठा करताच पैसे काढण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे बिल सादर केले असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, संबंधित कंत्राटदाराने मुख्याध्यापकांचे खोटे शिक्के सह्या केल्या असल्याचेही शिंदे म्हणाल्या. दरम्यान, संबंधित कंपनीसह या व्यवहारात गुंतलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.

दरम्यान, याबाबत जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र काळे यांना संबंधित प्रकरणाची विचारणा करण्यासाठी वांरवार भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा एसएमएसही काळे यांना करण्यात आला, परंतु काळे यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

पोलिसांत दाखल करणार तक्रार : जिल्ह्यातीलविविध शाळांमधील मुख्याध्यापकांच्या खोट्या सह्या शिक्के तयार करून देयके सादर करण्यात आल्यामुळे संबंधित मुख्याध्यापकांकडून पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याचे संगीता शिंदे यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानासह इंटरनेटशी जोडण्याच्या उद्देशाने मंजूर केलेल्या निधीतून कंत्राटदाराने शाळांना साहित्याचा पुरवठा केल्याने उद्देशाला हरताळ फासला आहे.

देयके थांबवण्यास सांगितले
दोन-तीनदिवसांपूर्वीसंगणक शाळांमध्ये पोहोचलेच नसल्याचे कानावर आले. त्यामुळे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून दिली असून, देयके थांबवण्यास सांगितले आहे. शाळांना संगणकांचा पुरवठा झाला नसून कंत्राटदारास रक्कमही दिली नाही.त्यामुळे घोटाळा झाला असे म्हणता येणार नाही. श्रीकांत देशपांडे, शिक्षकआमदार.
बातम्या आणखी आहेत...