आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलईडी बल्ब वाटपामध्ये ग्राहकांची लाखो रुपयांनी लूट, ग्राहकांनी केली फौजदारी कारवाईची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात मागील चार महिन्यांत महावितरण कंपनीने लाख ३७ हजार ७१० ग्राहकांना वितरित केलेल्या वीज बिलात एलईडी आकारच्या नावाखाली सरसकट ३८ रुपये अतिरिक्त शुल्क जोडण्यात आले. वास्तविकता यातील अनेक ग्राहकांनी बल्बची खरेदी करतेवेळीच ही रक्कम भरली आहे.
 
तरीही प्रत्येक ग्राहकांकडून ३८ रुपये याप्रमाणे ५२ लाखांच्यावर ही रक्कम असून हा प्रकार म्हणजे वीज ग्राहकांची सरार्स लूट असल्याचा आरोप करीत इइएसएल कंपनीविरुद्ध फौजदारी दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसने सोमवारी (दि. १०) महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
 
मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात इइएसएल कंपनीने महावितरणच्या मदतीने वीज ग्राहकांना एलईडी बल्ब वाटले. एका बल्बची किंमत ९५ रुपये होती. ग्राहकाने बल्ब घेतल्यास सदर बल्बची रक्कम एकाटप्प्यात किंवा दहा महिन्यांत प्रत्येक महीन्याच्या बिलातून प्रतिबल्ब साडे नऊ रुपये अशा पद्धतीने वसूल करण्याची पद्धत होती.
एक ग्राहक जास्तीत जास्त दहा बल्ब खरेदी करू शकतो. यापैकी जास्तीत जास्त बल्ब एकावेळी दहा महिन्यांच्या इन्स्टॉलमेंटवर देण्यात येत होते. दहा बल्ब घेतल्यास उर्वरीत सहा बल्बची होणारी रक्कम ग्राहकाला त्याचवेळी रोख स्वरुपात देणे बंधनकारक उर्वरित.पान
 
धक्कादायक! महावितरणने ‘डोळे बंद’ करून आकारली रक्कम
या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे इइएसएल कंपनीने बल्ब विकले आणि ती यादी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठवली. सदर ग्राहकांकडून रक्कम वसूल करायची असल्याचे सांगितले. त्यांनी पाठवलेल्या यादीची कोणत्याही प्रकारची खातरजमा करता सरसकट ग्राहकांना महिन्याच्या बिलात ३८ रुपये जोडून बिल पाठवले. वास्तविकता किती ग्राहकांनी खरेदी करतांना पुर्ण रक्कम दिली किती ग्राहकांनी इन्स्टॉलमेंटवर खरेदी केली, ही बाब पडताळणी करूनच ग्राहकांना बिल पाठवणे अपेक्षित होते. मात्र महावितरणच्या संबधित अधिकाऱ्यांनी ‘डोळे बंद’ करून इइएसएल कंपनीचे हीत साधत ग्राहकांना लाखों रुपयांचा भुर्दंड दिल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना युवक काँग्रेसचे पदाधिकारी.
 
शुल्क लागणार नाही
या संदर्भात काही तक्रार येताच आम्ही संबंधित विभागाला पत्र देवून बिलात लागणारी एलईडीची रक्कम लावू नये असे सांगितले होते. एप्रिलला दुसरे पत्र दिले.त्यामुळे या महिन्याच्या बिलात ही रक्कम जोडून येणार नाही.
- दिलीप मोहोड, प्रभारीअधीक्षक अभियंता,महावितरण कंपनी.
 
कोट्यवधीचा घोळ
ज्या ग्राहकांनी बल्ब खरेदीच केले नाही, त्यांनाही रक्कम लागून आली आहे. हा घोळ अमरावतीमध्ये ५० लाख रुपयांचा दिसत असला तरी राज्यात कोट्यवधींचा आहे. त्यामुळे इइएसएल कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई झाल्यास आम्ही जनआंदोलन करणार.
- सागर देशमुख, अध्यक्ष, अमरावती लोकसभा युवक कॉग्रेस
 
डिसेंबरपासून वसुली
जिल्ह्यात एकूण लाख ९० हजार ९९७ घरगुती वीज ग्राहक आहेत. डिसेंबर २०१६ मध्ये २० हजार ७१२, जानेवारी २०१७ मध्ये २० हजार ६८५, फेब्रुवारीमध्ये ३७ हजार ६०१ आणि मार्चमध्ये ३७ हजार ६४५ अशा प्रकारे चार महिन्यांत लाख ३७ हजार ७१० ग्राहकांच्या वीजबिलात ही अतिरिक्त रक्कम आकारण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...