आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपेश तायडेला कराटे प्रशिक्षणासाठी जिल्हा क्रीडा संकुलामध्ये दिले नि:शुल्क सभागृह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - झोपडपट्टीतील गरीब घरच्या विद्यार्थ्यांना चांगले वळण लागावे, ते व्यसनांपासून दूर राहावे तसेच त्यांचे उत्तम भविष्य घडावे या तळमळीने त्यांना निशुल्क कराटे, तायक्वांदो, बाॅक्सिंग, जित कुने दो अशा विविध मार्शल आर्टचे निशुल्क प्रशिक्षण देऊन राज्य राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षक रुपेश तायडेच्या जिद्दीचे वृत्त सोमवारी दिव्य मराठी दैनिकात प्रसिद्ध झाले.
या वृत्तात रुपेश उघड्यावर अन् अंधारात खेळाडूंना प्रशिक्षण देत असल्याची माहितीही दिव्य मराठीने दिली होती. या वृत्ताची दखल घेत विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी क्रीडा उपसंचालकांना लेखी आदेश देत रुपेशला प्रशिक्षणासाठी विभागीय क्रीडा संकुलातील एक सभागृह देण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. विभागीय आयुक्त हे विभागीय क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तर जिल्हाधिकारी हे विभागीय क्रीडा संकुल समितीचे पदाधिकारी जिल्हा क्रीडा परिषदेचे अध्यक्ष आहेत. दोघेही क्रीडाप्रेमी असल्यामुळे त्यांनी अत्यंत विपरित परिस्थितीत खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षक तायडेने आणखी उत्तम खेळाडू घडवावेत या उद्देशाने त्याला निशुल्क सभागृह देण्याचे आदेश दिले. रुपेश क्रीडा संकुलातील सभागृहात खेळाडूंना प्रशिक्षण द्यायचा. परंतु, त्याला प्रशिक्षण देण्यासाठी तांत्रिक कारणांमुळे मज्जाव केला होता. तेव्हापासून तो क्रीडा संंकुलात अंधारात खेळाडूंना प्रशिक्षण देत होता. भांडीधुणी, गवंडी काम, जनावरे चरायला जाणाऱ्यांची ही मुले रुपेशच्या मार्गदर्शनामुळे राष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहेत.

बातम्या आणखी आहेत...