आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वास‘घात’ केल्यामुळे मित्रानेच खुपसला खंजीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- चांदूर रेल्वे मार्गावर शुक्रवारी (दि. ३)अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता मात्र शनिवारी रात्रीपर्यंत या मृतकाची ओळख पटली नव्हती. दरम्यान शनिवारी रात्री सायबर सेलने तांत्रिक पद्धतीच्या माध्यमाने मृतदेहाची ओळख पटवली तसेच त्यानंतर अवघ्या चार तासात मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यालाही अटक केली. हा खून मित्रानेच केल्याचे पुढे आले आहे. 
अनिल रामचंद्र चौधरी (३० रा. बालाघाट, मध्यप्रदेश) असे मृतकाचे नाव आहे. तर नीलेश अशोकराव सहारे (२४, रा. नवसारी, अमरावती) असे मारेकरी मित्राचे नाव आहे.
 
नीलेश आणि अनिल हे दोघे मागील पाच ते सहा वर्षांपासून मित्र आहेत. नीलेश हा शहरातील एका हॉटलमध्ये वेटरचे काम करतो तर अनिल हा जालना येथे गणेश ट्रस्टमध्ये काम करत होता. मार्चला सकाळी वाजता जालन्यावरून अनिल शहरात आला थेट नीलेशच्या घरी पोहोचला. त्यावेळी नीलेश घरी नव्हता. मात्र काही वेळातच तो घरी आला, त्यावेळी अनिल हा नीलेशच्या घरात होता.
 
यापूर्वीही अनिलच्या वागण्यावर नीलेशला संशय आला होता. अनिलचे वागणे योग्य नसल्यामुळे त्याचा काटा काढायचा, असे नीलेशने ठरवले. त्याच दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास नीलेश हा अनिलला घेवून मालखेड तलाव पाहण्यासाठी घेवून गेला. 
 
परत येत असताना त्याने दुचाकी उभी केली शहरापासून किलोमीटरवर एका शेतात अनिलवर चाकुने घाव केला, यातच त्याचा मृत्यू झाला. 
 
त्यानंतर नीलेश हा घरी आला. दुसरीकडे दोन दिवसांनतर फ्रेजरपुरा पाोलिसांना चांदुर रेल्वे मार्गावर अनोळखी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला होता. मात्र मृतदेहाची ओळख पटत नसल्यामुळे मारेकरी शोधणे पोलिसांसाठी आव्हान होते.
 
दरम्यान पोलिसांनी माहिती काढून नवसारीत राहणाऱ्या नीलेश सहारेला शनिवारी उशिरा रात्री अटक करण्यात यश मिळवले. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम, एपीआय काचंन पांडे, अनिल गवंड, पीएसआय नितीन थोरात, गजानन विधाते, दिपक श्रीवास, सुभाष पाटील, विनय मोहोड, अमर बघेल, इम्रान सय्यद, उमेश कापडे, राजेश बहीरट यांनी केली आहे. 
 
मोबाइल बिलाच्याच आधारे पटली ओळख : मृतदेहापासूनकाही अंतरावर एक बॅग होती, या बॅगमध्ये पोलिसांना मोबाइल खरेदी केल्याचे बिल मिळाले होते. या बिलावर एक मोबाइल क्रमांक होता. मात्र हा उत्तरप्रदेशमध्ये बंद झाल्याचे आढळत होते. त्यानंतर मात्र सायबर सेल पोलिसांनी तब्बल १२ तास मेहनत घेवून मृतकाची ओळख पटवण्यासाठी मेहनत घेतली.
 
अनिल सहा वर्षांपुर्वी करायचा शहरात काम : अनिलहा सहावर्षांपूर्वी शहरातील एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. त्याच हॉटेलमध्ये नीलेश काम करायचा, त्यावेळीपासून या दोघांची मैत्री होती.
 
 दरम्यान तीन वर्षांपूर्वी अनिलने शहरातील काम सोडून जालना गाठले. मात्र यांची मैत्री कायम होती. दोन वर्षांपूर्वी नीलेशचे लग्न झाले. त्यानंतर अनिल अधूनमधून नीलेशच्या घरी यायचा. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच नीलेशला अनिलच्या वर्तणुकीवर संशय आला होता. अनिलने आपल्या विश्वासाचा घात केल्याचे मार्चला पुन्हा पुढे आल्याने नीलेशने त्याचा काटा काढला आहे. अशी माहिती अणरावती 
पोलिसांनी दिली. 
 
बातम्या आणखी आहेत...