आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीसाठी मित्रांनीच आवळला आशुतोषचा गळा, गुन्ह्यामध्ये चोरीची दुचाकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: आशुतोष राठोड खून प्रकरणातील आरोपी, सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक.
दारव्हा - गेल्या दोन ते तीन दिवसापासून चर्चेत असलेले येथील आशुतोष राठोड याच्या खुनाचे रहस्याचा अखेर उलगडा झाला असून खंडणीच्या मागणीसाठी मित्रांनीच आशुतोषचा गळा आवळला आहे. तशी कबूली या आरोपींनी दिली असून आरोपींनी या गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकीही चोरीची असल्याचे समजले आहे.

दारव्ह्यातील ग्रामसेवक सोसायटीमध्ये राहणारा आशुतोष राठोड वय २१ वर्षे हा दि. जानेवारीला सायंकाळी व्यायामासाठी जातो असे म्हणून घराबाहेर पडला, त्यानंतर त्याचा मृतदेहच सापडला होता. दरम्यान चौकशीत त्याचा खून त्याच्या जवळचे मित्र सौरभ दुर्गे, अक्षय तिरमारे यानींच संगनमताने केल्याचे आढळून आले.
मारेकरी अक्षय याने घटनेच्या दिवशी आशुतोषला आपल्या दुचाकीवर बसवून चिंतामणीनगरातील त्याच्या खोलीवर नेले दोघेही मारेकऱ्यांमध्ये चर्चा झाली. आशुतोषचे वडील श्रीमंत आहे. त्याचे अपहरण करून त्याच्या वडिलांकडे २० लाख रुपयांची खंडणी मागण्याच्या बेताने आशुतोषला रूमवर ठेवल्या गेले. परंतु आशुतोषचे हे अपहरण अंगलट येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विचलीत झालेल्या अक्षय सौरभने अखेर आशुतोषला संपवण्याचा विचार केला. अक्षयने नायलॉनची दोरीने गळा आवळला सौरभ हा आशुतोषचे पायावर बसून त्याचे तोंड दाबत होता. दोघेही आशुतोष मरण पावल्याची खात्री झाल्यावर त्याला रूमवर ठेवून दोघेही बाहेर पडले. रात्र झाल्यानंतर ते १० वाजताच्या सुमारास आशुतोषचा मृतदेह दुचाकीच्या मधात ठेऊन चिंतामणी मंदिरासमोरील किन्ही शिवारातील कॅनलमध्ये पुलाखाली नेऊन पेट्रोल टाकून पेटवला घटना स्थळावरून पोबारा केला. या प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे शाखेने तीन दिवसात लावला आहे. आशुतोष राठोड याच्या खुनातील आरोपींना पोलिस निरिक्षक संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुगत पुंडगे, सचिन हुमने, आशिष चौबे, सुरेंद्र वाकोडे, सतिश गजभीये, साजीद खान, सुमित पाळेकर यांनी अटक केली. दुसरीकडे या प्रकरणातील अक्षय तिरमोर, सौरभ दुर्गे त्यांचा मित्र राहुल मदनकर या तीघांनी यवतमाळ येथील एका शोरूम समोरून दुचाकी लंपास केली होती. तीच दुचाकी आशुतोषच्या खुनात वापरण्यात आली. तिघांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी राहुल मदनकर याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहे.