आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदा-सुव्यवस्थेवरून आता मुख्यमंत्री रडारवर, अधिवेशनात घेरण्याची विरोधकांची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - उपराजधानी नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारची कोंडी करण्यात विरोधकांना फारसे यश आलेले नसले तरी दुसऱ्या आठवड्यात राज्यासह प्रामुख्याने नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य करण्याची रणनीती विरोधक आखत आहेत.

नोटबंदीसह राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आमच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे संकेत विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दिले आहेत. त्यातही विरोधकांकडून नागपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावले जाण्याची शक्यता अधिक आहे. भाजपच्या आमदारपुत्रांचा बिअर बारवरील हल्ल्याची घटना ताजी आहे. या घटनेत एका युवकाचा हकनाक बळी गेला असून आमदारपुत्र अद्यापही कोठडीत आहेत. बिअर बारमधील वादातून शहरात गोळीबाराच्या घटना घडल्या. या घटना प्रामुख्याने मुख्यमंत्री प्रतिनिधित्व करत असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरात घडल्या आहेत.

मागील वर्षीच्या तुलनेत उपराजधानीतील गुन्हेगारी कमी झाल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा आहे. त्यासाठी आकडेवारी मांडली जात आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा अंदाज केवळ आकडेवारीच्या माध्यमातून मांडता येणार नाही, असा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दावा आहे.
बातम्या आणखी आहेत...