आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणरायाचे भक्तीभावामध्ये आज होणार सर्वत्र आगमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘गणपती बाप्पा मोरया’ अशा घोषणा देत विद्येची देवता विघ्नहर्ता श्री गणरायांचे वाहन मूषकासह आज भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी सोमवारी सप्टेंबरला वाजत-गाजत घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये आनंद उत्साहात आगमन होत आहे.दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची भाविकांनी एक आठवडा आधीपासूनच तयारी चालवल्याने शहरातील मुख्य बाजारपेठा चांगल्याच गजबजल्या आहेत. देखण्या, रेखीव मातीचे बाप्पा घरी सोबत नेण्यासाठी भक्तांची चांगलीच झुंबड उडाली असून, वक्रतुंडाच्या आगमनाने घरात पावित्र्य मांगल्याचे वातावरण राहावे म्हणून ते रंगरंगोटी करून सजवण्यात तर आलेच त्यात पताका, तोरणे, शोभेच्या वस्तू ठेऊन अधिकच आकर्षक करण्यात आले आहे.

गणपती बाप्पांना प्रिय असलेल्या मोदकांचा नैवेद्य घरोघरी तयार झाला असून, लाडू, पेढे प्रसादाचे इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मिठाईच्या दुकानामध्येही चांगलीच गर्दी आहे. मखरात गणरायांना आसनस्थ केले जाणार असल्यामुळे देखणे मखर, विजेच्या माळा, फुलांच्या माळा, आंब्याची पाने, दुर्वा, कमळ फुले, आघाडा, केना, केळी, सेप, नारळ हे पुजेचे साहित्य खरेदीसाठी पूर्वसंध्येला चांगलीच लगबग सुरू होती. त्यामुळे मुख्य बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीने भरगच्च भरलेल्या दिसत होत्या.

मूर्ती कशी असावी ? : चिकणमाती किंवा शाडूमाती यापासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेश तत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो.घरच्या प्रमुख व्यक्तीने शकतो अनवाणी पायाने गणेशमूर्ती आणावी. त्यासाठी घरातून निघतानाच तबक, गुलाल नवीन रुमाल घेऊनच निघावे. त्यानंतर गणेशमूर्ती घ्यावी. गणेशमूर्ती आवडली की प्रथम त्या मूर्तीवर गुलाल उधळावा ‘मंगलमूर्ती मोरया’ असा गजर करीत, तबकात मूर्ती घ्यावी त्यावर रुमाल झाकावा मुलाबाळांसह आनंदाने ‘श्रीं’सह घरी यावे.घरी आल्यानंतर दरवाजातच थांबावे. घरच्या लक्ष्मीने अखंड पोळी त्या मूर्तीवरून ओवाळून बाहेर ठेवावी श्री गणरायांचे सोन्याने औक्षण करावे पतीच्या, मुलांच्या कपाळाला गुलाल लावून ‘गणेशा आपले सहर्ष आगमन असो’, असे म्हणून श्रींना घरात घ्यावे. ज्या जागी स्थापना करायची, त्या जागेवर अक्षता ठेवून त्यावर गणेशमूर्ती ठेवावी, असे पंडित शहाकार यांनी सुचवले आहे.

मूर्तीला आणण्याचे मुहूर्त
सोमवारीसप्टेंबरला श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ०८:०० पासून भद्रा(अशुभ) आहे. यामुळे एक दिवस अाधीच अर्थात सप्टेंबरला सकाळी लाभ मुहूर्तावर ९.३० ते ११, अमृत मुहूर्तावर सकाळी ११ ते दु. १२.३० आणि शुभ मुहूर्तावर दु.२ ते ३.३० पर्यंत भाविकांनी श्री गणेश मूर्ती घरी आणली.

आज सकाळी ६.१५ ते ७.४५ पर्यंत स्थापना
गणेश चतुर्थीच्या दिवशी आज भद्रकालामुळे घरगुती गणेश, मंदिर मंडळातील विघ्नहर्त्याची सकाळी ६.१५ ते ७.४५ पर्यंत मूर्तीची स्थापना करू शकतील. सकाळी ७.५८ मिनिटांपासून ते ९.०४ पर्यंत भद्रकाल राहणार आहे.

या मुहूर्तावर होणार गणेशाची स्थापना
श्री गणपती विघ्नहर्ता आणि सुखकर्ता आपल्या घरी मुहूर्तावर आणल्यास वर्षभर येणाऱ्या विघ्नांचा नाश करेल. शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात. दिनमानाचा पंधराव्या भागास मुहूर्त म्हणतात. रात्रीमानाचेही तेवढेच मुहूर्त असतात. तसेच शुभकार्यास योग्य काळासही मुहूर्त असे म्हणतात, अशी माहिती पंडित संजय शहाकार यांनी दिली.

श्री गणरायाची मुर्ती कशी असावी
गणेशमूर्ती शाडू मातीची असावी. ती ते १० इंच उंचीची असावी. ही गणेशमूर्ती- एकदन्तम्- एक दात असलेले, चतुर्हस्तम्- चार हात असलेले, पाशमंकुश धारिणम्- पाश अंकुश ही दोन शस्त्रे धारण केलेले उर्वरित हातात एकात तुटलेला दात तर दुसऱ्या हाताने प्रसाद मुद्रा करून भक्तांना वर प्रदान करणारे, सुपासारखे कान, लंबोदर, मूषकासह अथवा मूषकावर स्वार असणारे, अशी मूर्ती असावी.
बातम्या आणखी आहेत...