आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजेंद्र चौहानांनी घेतली सरसंघचालकांची भेट; म्हणाले, RSSच्या सांगण्यावरून नियुक्ती नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हजन इस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते गजेंद्र चौहान हे आज (गुरुवार) सकाळी 11 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. भागवत व चौहान यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. चौहान यांनी सरसंघचालकांची अचानक भेट घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात उलटसूलट चर्चा सुरु झाली आहे.

काय म्हणाले गजेंद्र चौहान...?
सरसंघचालक यांच्या भेटीमागे कुठलाही अजेंडा नसल्याचे चौहान यांनी म्हटले आहे. सरसंघचालक आपल्यासाठी वडिलांप्रमाणे असून त्यांना मुलाच्या लग्नाची पत्रिका द्यायला आल्याचे चौहान यांनी सांगितले. तसेच संघाच्या सांगण्यावरून एफटीआयआयच्या अध्यक्षपदी आपली नियुक्ती झाली नसल्याचेही चौहान यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, एफटीआयआयचे अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गजेंद्र चौहान यांनी पहिल्यांदा मोहन भागवत यांची भेट घेतली. संघाच्या सांगण्यावरून चौहान यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.

चौहान हे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका कार्यक्रमासाठी आले आहे. यादरम्यान त्यांनी संघाच्या मुख्यालयात जाऊन मोहन भागवत यांची भेट घेतली. मुलाच्या विवाहाचे निमंत्रण दिले. नंतर ते थेट छिंदवाड्याकडे रवाना झाले.

चौहान म्हणाले यापुढे एक्स्टेंशन मिळणार नाही...
एफटीटीआयमध्ये सध्या गाजत असलेल्या हॉस्टेलच्या मुद्यावरही चौहान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, यापुढे विद्यार्थ्यांना एक्स्टेंशन मिळणार नाही. तीन वर्षांनंतर हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी विद्यार्थ्यांना एका वर्षाचे एक्स्टेंशन दिले जात होते. आता मात्र, विद्यार्थ्यांना तीन वर्षांनंतर हॉस्टेलमध्ये थांबता येणार नाही. त्यांना तत्काळ हॉस्टेल सोडावे लागणार आहे.

सेमिस्टर पॅटर्न लागू होण्याचा प्रश्नच नाही...
एफटीटीआयमध्ये सेमिस्टर पॅटर्न लागू करण्यासाठी अकॅडमिक काऊन्सिलची परवानगी अावश्यक आहे. जोपर्यंत गव्हर्निंग काऊन्सिलची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत सेमिस्टर पॅटर्न लागू होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे चौहान यांनी यावेळी सांगितले.

FTII मध्ये 'गजेंद्र चौहान वापस जाओ'च्या घोषणा
पुण्यातील फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)च्या अध्यक्षपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या निवडीला विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध केला होता. विद्यार्थ्यांनी जवळपास साडेतीन चार महिन्यांपेक्षा जास्त काळ आंदोलन केले होते. दरम्यान, चौहान यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याची कुणकुण लागताच एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी चौहानविरोधात 'गजेंद्र चौहान वापस जाओ' अशा घोषणा ‍दिल्या होत्या.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, असा आहे FTII चे अध्यक्ष गजेंद्र चौहान यांचा 34 वर्षांचा फिल्मी प्रवास...
बातम्या आणखी आहेत...