आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहीद जवान सुरेश गावडेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यातील कोटगुल येथे नक्षलवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात शहीद झालेले जवान सुरेश गावडे यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकातील जवान नक्षलविरोधी अभियानावर असताना कोटगुल-सोनपूर मार्गावर आठवडी बाजाराजवळ नक्षलवाद्यांनी शुक्रवारी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यात तीन जवान जखमी झाले होते. त्यापैकी सुरेश गावडे, सोनल खेवले या दोन गंभीर जखमी जवानांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी नागपुरात आणले होते. त्यापैकी सुरेश गावडे यांना नागपुरात मृत घोषित केले. शहीद गावडे यांचे पार्थिव शनिवारी गडचिरोली येथे दाखल झाल्यावर तेथे पोलिस मैदानावर त्यांना अंतिम सलामी देण्यात आली. त्यानंतर पार्थिव त्यांच्या आरमोरी तालुक्यातल्या भाकरोंडी येथील गावी रवाना करण्यात आले. तेथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. 


उल्लेखनीय कामगिरी 
जवानसुरेश गावडे हे १९९५ मध्ये गडचिरोली पोलिस दलात दाखल झाले होते. गडचिरोलीच्या नक्षलविरोधी पथकात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. नक्षलविरोधी अभियानात यापूर्वी एकदा ते भूसुरुंग स्फोटातून बचावले होते. तर दुसऱ्यांदा एका अभियानात त्यांना गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...