आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र: ट्रक-इंडिकाच्‍या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - गडचिरोली-नागपूर महामार्गावर विरूद्ध दिशेने येणा-या भरधाव ट्रकची इंडिका मोटारीला धडक बसून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहायक पोलिस निरिक्षकासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्‍याची माहिती आहे. रात्री दोनच्‍या सुमारास हा अपघात झाला.

मृतांमध्‍ये एपीआय अधिकारी मनोज धारणे
मनोज धारणे, असे अपघातात ठार झालेल्या पोलिस निरिक्षकाचे नाव आहे. धारणे यांच्‍यासह त्‍यांच्‍या आई विमल, गर्भवती बहिण वनिता आणि दोन पुतण्यांचा या अपघातात मृत्यू झाला. त्यांची पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाल्‍याची माहिती आहे. धारणे कुटुंबिय एका खासगी कार्यक्रमासाठी नागपूरला गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री ते इंडिकाने नागपूरहून गडचिरोलीकडे परतत होते. तेव्‍हा हा अपघात झाला. विरूद्ध दिशेने येणा-या भरधाव ट्रकने समोरून येणा-या एका इंडिकाला जबर धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, पाचही जण घटनास्‍थळावर ठार झाल्‍याची माहिती आहे.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा,
चिपळूण- शनिवारी बेपत्‍ता झालेल्‍या तरूणाचा रविवारी आढळला मृतदेह
कांदिवली- नाल्‍यात आढळले अज्ञात जोडप्याचे मृतदेह
पुणे - दिलीप वळसे पाटील यांना ह्रदयविकाराचा झटका

पुणे -मोबाइल चार्जरवरून वाद, डोक्‍यात खलबत्‍ता घालून तरूणाची हत्‍या