आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुकल्‍याचा मृतदेह पित्‍याला न्‍यावा लागला 7 किलोमीटर खांद्यावरून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली - एका आदिवासी बांधवाला त्‍याच्‍या मृत मुलाचा मृतदेह तब्‍बल 7 किलोमीटर अंतरावर खांद्यावर घेऊन जावे लागले. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.
काय आहे प्रकरण...
- तुमरगुडा या गावातील तोदे मुरा पोटावी यांनी मुलाचा मृतदेत 7 किलोमीटर अंतरावर खांद्यावर नेला.
- तोदे मुरा पोटावी यांचा 10 वर्षीय मुलगा संदीप हा आजारी पडला होता.
- उपचारासाठी त्याला एटापल्लीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते.
- मात्र, उपचारादरम्यानच या मुलाचा मृत्‍यू झाला.
- मृतदेहाची ताब्यात मागितल्‍यानंतर डॉक्टरांनी मनमानी केली व एक दिवस मृतदेह ताब्‍यात ठेवला.
- पोटावी यांनी असा आरोप केला आहे.
- शिवाय रुग्‍णवाहिका उपलब्‍ध करून न दिल्‍याने या पित्‍यावर ही वेळ आली आहे.