आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PSI ने जंगलात पुरला होता पत्‍नीचा मृतदेह, तपासात मिळाले हाडे, कपडे आणि चार दात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली- दुसरे लग्‍न केल्‍यानंतर पहिल्‍या लग्‍नाबाबत कुणाला माहिती होऊ नये म्‍हणुन एका पीएसआयने पत्नीची गळा दाबून हत्या केली व पत्‍नीचा मृतदेह जंगलात पुरून ठेवला. या पीएसआयला पोलिसांनी अटक केली आहे. पत्‍नीच्‍या मृतदेहाचे अवशेषही पोलिसांनी शोधुन काढले आहेत.
अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यात असलेल्‍या शिराळा येथील रहिवासी अविनाश तांगड हा पीएसआय म्‍हणुन अहेरीत कार्यरत होता. सप्‍टेबर 2014 मध्‍ये त्‍याने अॅसेन्‍था पिल्‍लई या तरूणीशी मंदिरात प्रेमविवाह केला. त्‍याने ही बाब घरीही सांगितली नव्‍हती. त्यानंतर घरच्यांच्या इच्‍छेप्रमाणे त्‍याचे लग्‍न ठरले. दुसरे लग्‍नही झाले.
दुसरी पत्नी घरी आली तेव्हा आधीची पत्‍नी अॅसेन्‍था वडिलांना भेटायला अहमदनगरला गेली होती. 20 फेब्रुवारीला ती परत आली, तेव्हा अविनाशने तिला दुसऱ्या खोलीत ठेवले. या दोघींना परस्परांबद्दल माहिती मिळू नये यासाठी अविनाश प्रयत्न करत होता. माञ काही दिवसातच त्‍याचे हे बिंग फुटले. या दोन पत्‍नींमध्‍ये जोरदार वादही झाला.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, कशी उघड झाली घटना..