आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश महाजनांसमोर गडकरींकडून आरोग्य विभागाचे वाभाडे; हवी ती मदत करण्याचे दिले आश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी. - Divya Marathi
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी.
नागपूर- आरोग्य विभागात मशिन्स असले तर ऑपरेटर नाही आणि ऑपरेटर असले तर मेंटेनन्स नाही, अशी परिस्थिती असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. राज्याच्या आरोग्य विभागाचे वास्तव वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मांडले. 
 
राज्यात नवनवीन आरोग्यासंदर्भात सोयी आणल्या जातात. मात्र एकतर मशिन्स येत नाहीत. मशिन्स आलेत तर ऑपरेटर येत नाहीत. ऑपरेटर आले तर मेंटेनन्स नाही आणि मेंटेनन्स केले तर पैसे नाहीत, अशी अवस्था आहे, असे सांगत गडकरींनी राज्याच्या आरोग्य विभागाची परिस्थिती त्या विभागाच्या मंत्र्यासमोरच सांगितली. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थीही उपस्थित होते. केंद्राकडून काय हवी ती मदत घ्या आणि सगळे व्यवस्थित ठेवा, असेही गडकरींनी गिरीश महाजनांना प्रत्यक्ष सांगितले. राज्यातील आणि देशातील पहिल्या शासकीय स्तरावर स्टेम सेल नोंदणीची मोहीम आणि प्रकल्प नागपुरात सुरु झाला. या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...