आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजलक्ष्मी आहे शेगाव संस्‍थानची लाडकी हत्‍तीण, चप्पल घालून आरतीला जाते मंदिरात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलढाणा- बुलढाणा जिल्‍ह्यातील श्री संत गजानन महाराज मंदीरात आज महाराजांच्‍या पुण्‍यतिथी निमित्‍त भाविकांनी गर्दी केली आहे. मंदिराच्‍या धार्मिक कार्यक्रमांमध्‍ये हजेरी लावणारी संस्‍थानची लक्ष्‍मी हत्‍तीण भाविकांचे आकर्षण ठरते. दररोज सकाळी आणि सायंकाळी श्रींची दैनंदिन आरती मोठ्या थाटात साजरी होते. या आरतीला ही गजराणीही नित्‍याने उपस्‍थित असते. या हत्‍तीणीच्‍या लिला पाहून भाविकही कुतूहल व्‍यक्‍त करतात. आज जाणून घेऊया श्री गजानन महाराज संस्‍थानमधील हत्‍तीणीविषयी..
- गजानन महाराज संस्‍थानकडे यापूर्वी चंपाकली नावाची हत्‍तीण होती.
- चंपाकलीच्‍या निधनानंतर संस्‍थानमध्‍ये बिहारमधील ‘लक्ष्मी’ हत्तीणीचे आगमन झाले.
- गजराणी लक्ष्‍मीच्‍या राहण्‍याची संस्‍थानतर्फे उत्‍तम सोय केली जाते.
- पायाला दुखापत होऊ नये म्‍हणून संस्‍थानतर्फे या हत्‍तीणीला चपला बनवण्‍यात आल्‍या.
- लक्ष्‍मीच्‍या आरोग्‍याची सेवेकरी पूर्णपणे काळजी घेतात.
दोन वेळा होते दैनंदिन आरती...
- श्री संत गजानन महाराज मंदिरात दररोज दोनवेळा आरती होते.
- सकाळी 8 वाजता, सायंकाळी सूर्यास्‍ताला श्रींची आरती होते.
- या दोनही आरतीला न चुकता गजराणी लक्ष्‍मीची उपस्‍थिती असते.
- भाविकांप्रमाणे या हत्‍तीणीच्‍या चपलाही स्‍टँडवर काढल्‍या जातात.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा..
काय आहे शेगाव नावाचा इतिहास..
1908 मध्‍ये संस्‍थान स्‍थापना..
अशी आहे दर्शनाची व्‍यवस्‍था..
प्रथमोचार केंद्र व मातांसाठी खास सुविधा..
बातम्या आणखी आहेत...