आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण रक्षणार्थ सरसावले चिमुकले, स्वत:च्या हातानेच घडवले मातीचे सुबक गणपती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिमुकल्यांनी मातीचे गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. - Divya Marathi
चिमुकल्यांनी मातीचे गणपती तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले.
अमरावती- श्री गणरायांचे आगमन अवघ्या पाच दिवसांवर आले असताना शहरात त्यांना वाजत-गाजत आणण्याची धूम सुरू झाली आहे. मात्र त्याआधीच चिमुकल्या बालगोपालांनी स्वत:च्या हाताने मातीचे श्री गणेश तयार केले आहेत. त्याच विघ्नहर्त्याची यंदा घरी विधीपूर्वक स्थापना केली जाणार आहे. 

निसर्ग रक्षणार्थ देखण्या रेखीव दिसत असल्या तरी प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या (पीआेपी) गणेश मूर्तींची स्थापना करण्याऐवजी निसर्ग रक्षणार्थ स्वत:च्या हाताने तयार केलेल्या गणेश मूर्तींची स्थापना करण्याचा बालकांनी निर्णय घेतला. विशेष बाब अशी की, नैसर्गिक रंगांचा वापर करून गणनायकाला देखणे रूप प्रदान करण्यात आले आहे. यामुळे एकतर स्वत:च्या हाताने पवित्र मातीपासून निर्मित गणरायांचे विसर्जन तलाव, सराेवर, नद्यांमध्ये केले तरी पाणी प्रदूषित होणार नाही. तसेच नैसर्गिक रंग असल्यामुळे त्यापासून जलचरांना कोणताही धोका नाही. समाधान शांती मिळणार ती वेगळीच अशा प्रतिक्रिया बालगोपालांनी व्यक्त केल्या. काही सामाजिक संस्था शाळांमधून मुलांना मातीचे गणपती घडवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्याचप्रमाणे सुमारे एक महिना आधीपासूनच विविध आकारांचे सुबक गणराय कसे तयार करायचे याचेही प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे विविध आकाराच्या रेखीव मूर्ती तयार झाल्या. आपला बाप्पा घडवू या आपल्या हाताने या कार्यशाळेचे आयोजन शहराच्या विविध भागात शिवराय कुळकर्णी यांनी केले. मुलांचा नर्धार पाहता पालकांनीही त्यांना सहकार्य करीत मातीचे गणपती स्थापन करण्याचा निश्चय केला. 

पर्यावरणाला हातभार : स्वत:च्याहाताने तेही अगदी मातीचे विविध आकाराचे गणराय तयार करण्यास शालेय विद्यार्थी पालकांनीही उत्साह दाखवल्याने सर्वांमधील कलेला वाव मिळाला. सोबतच या उत्सवाचे पावित्र्यही जपले जाऊन पर्यावरण रक्षणासाठी हातभार लागणार आहे. हाताने घडवलेल्या बाप्पांना दहा दिवस घरी ठेऊन त्यांची पूजा करण्याचा आनंद शांती मिळणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...