आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS- अमरावतीमध्‍ये कृत्रीम तलावात गणेश विसर्जनाला सुरूवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहर परिसरातील पानवठ्यांचे प्रदुषण होऊ नये यासाठी अमरावती शहरातील तलावांभोवती कृत्रीम तलाव तयार करून त्‍यामध्‍ये बाप्‍पाच्‍या विसर्जनाला सुरूवात झाली आहे. सकाळी सात वाजल्‍यापासून ढोल ताशांच्‍या गजरात घरगुती गणेश व बाल गणेश मंडळांनी मिरवणूका काढल्‍या व विसर्जनाला सुरूवात केली आहे.
ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्‍त
शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. शहरालगतचे छत्री आणि वडाळी तलाव येथे बॅरीगेट्स लाऊन निर्माल्‍य गोळा करण्‍यात येत आहे. तलावाभोवती गर्दी होऊ नये यासाठी केवळ दोन ते तीन लोकांनाचा आरक्षीत परिसरात प्रवेश देण्‍यात येत आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, अमरावतीमधील बाप्‍पाचे विसर्जन व बंदोबस्‍त..
( सर्व छाया - मनीष जगताप, अमरावती )