आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणूक मार्गांची तत्काळ करावी दुरूस्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सोमवारपासून(दि. ५) सुरू होणारा गणेशोत्सव आगामी काळात असलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेसह इतर महत्वाच्या विषयांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री प्रवीण पेाटे यांनी शनिवारी (दि. ३) बैठक घेतली. यावेळी विसर्जन मिरवणूक मार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरूस्ती करण्याचे आदेश त्यांनी साबांविच्या अधिकाऱ्यांना दिले आहे.
या बैठकीला पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंत पवार, पोलिस अधीक्षक लखमी गौतम, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर, साबांवि महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व तहसीलदार ठाणेदार, सर्व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी , परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अमरावती शहर तसेच जिल्ह्यातील अन्य शहरात गणपती विर्सजनादरम्यान सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही दुर्घटना होऊ नये यादृष्टीने विर्सजन मिरवणुकीचा मार्ग निश्चित करावा, तशी पुर्वसुचना नागरिकांना देण्यात यावी. चौकांमध्ये महत्वाच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. बैठका घेऊन कार्यक्रम स्थळी विज पाण्याची सुविधा ठेवून उत्सवादरम्यान ध्वनी प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी,असे निर्देश पाेटे यांनी िदले.
गतवर्षी शहरात ५४० गणेश मंडळ होते. यावर्षी ५५२ पर्यंत ही संख्या राहील,अशी माहिती पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार, मोर्शी , वरुड या संवेदनशील शहरात पोलिस सुरक्षा वाढविण्यात आल्याचे एसपींनी सांिगतले.

ते २४ सप्टेंबरपर्यंत भारनियमन बंद
या उत्सवाच्या काळात वीज भारनियमन करण्यात येणार नाही. अशी माहिती वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. ज्या गणेश मंडळाचे गणपती विर्सजन दहाव्या दिवसानंतर असेल अशा गणेश मंडळाची यादी पोलिस विभागाने वीज कंपनीला द्यावी म्हणजे त्यावेळी सुध्दा भारनियमनात सुट देता येईल, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...